चोपडा शहरातील नर्मदा नगरात रोटरी क्लब तर्फे वृक्षारोपण
चोपडा दि.०२(प्रतिनिधी) विश्वातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था म्हणून रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवर सुपरिचित आहे जगभरातील शाखांद्वारा विविध क्षेत्रातील सेवाभावी विधायक उपक्रम राबविणाऱ्या रोटरीच्या नूतन वर्षाची दरवर्षी एक जुलैला सुरुवात होते या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा एक भाग असलेल्या रोटरी क्लब चोपडा तर्फे नूतन रोटरी वर्षाची सुरुवात नुकतीच पर्यावरण पूरक अशा वृक्षारोपण कार्यक्रमाने चोपडा येथील नर्मदा नगर मध्ये डॉक्टर्स डे, चार्टर्ड डे, कृषी दिवस व नूतन रोटरी वर्षारंभाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
नवनिर्वाचित रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील तसेच मानद सचिव गौरव महाले सर यांनी डॉक्टर डे निमित्त चोपडा शहरातील नामवंत डॉ आनंद पाटील, डॉ पराग पाटील, डॉ अमोल पाटील, डॉ प्रफुल पाटील, डॉ वैभव पाटील तसेच CA रोटे तेजस जैन, पवन गुजराथी, व अर्पित अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शिरपूर रस्त्यालगत असलेल्या नर्मदा नगर येथील मालती हॉस्पिटल जवळ वृक्षारोपण कार्यक्रमात प्रामुख्याने निंब पिंपळ तसेच विविध जातीची झाडे लावण्यात आली व त्यांना ट्री गार्ड बसवण्यात आले हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम फक्त एक दिवसाचा नसून वर्षभर विविध कॉलन्यांमध्ये रोटरी क्लब तर्फे राबविण्यात येणार असल्याचे नवीन अध्यक्ष ॲड रुपेश पाटील यांनी सांगितले सदर कार्यक्रमास रोटरीचे नवनिर्वाचित सहप्रांतपाल रोटे नितीन अहिरराव, प्रोजेक्ट चेरमन रोटे महेंद्र बोरसे, रोटे एम डब्ल्यू पाटील, रोटे व्ही एस पाटील, रोटे संजीव गुजराथी, रोटे अनिल अग्रवाल, रोटे अरुण सपकाळे, रोटे प्रदीप पाटील, रोटे विलास कोष्टी, रोटे चंद्रशेखर साखरे तसेच नूतन ट्रेझरर रोटे पृथ्वीराज राजपूत हे उपस्थित होते तसेच इनरव्हीलच्या अध्यक्षा सौ नीता अग्रवाल, सौ शैला सोमानी, सौ मीना पोद्दार, सौ सोनल जैन,सौ जागृती सोनवणे हेदेखील उपस्थित होते.