विजेचा शॉक लागून बैल जागीच ठार
अकोला बाजार दि.०२ (प्रतिनिधी प्रवीण राठोड) गावाशेजारी लागून असलेल्या विद्युत रोहित्राचे केबल तारे मधून प्रवाहित असलेल्या विजेचा शॉक लागून शेतकर्यांचा बैल जागीच ठार झाला. ही घटना अकोला बाजार येथून 2 km अंतरावर असलेल्या मांजार्डा या गावी शुक्रवार दिनांक 01- जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता घडली. मांजार्डा येथील शेतकरी संतोष राऊत हा आपल्या शेतातून गुरे चारा चारून घरांकडे परत येत असताना त्यातील एका बैलाला विजेचा शॉक लागल्याने बैल जागीच ठार झाला. त्यामुळे शेतकरी संतोष राऊत यांचे अंदाजित 40 ते 50 हजार रुपयांची हानी झाली. आणि ऐन या पेरणीच्या हंगामात बैल मरण पावल्याने संतोष राऊत हतबल झाले आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणा, कारभारात असलेला गलथान, तसेच अकोला बाजार परिसरातील सर्वच विद्युत रोहित्राचे अपूर्ण केलेले काम, आणि कोणत्याही प्रकाराचे mentains केले गेले नाही. व कोणत्याही विद्युत रोहित्रावर झाकण नाही, अश्या या परिणामांमुळे संतोष राऊत यांच्या बैलाच्या बळी गेला. सदर घटनेची माहिती वडगाव(जंगल) पोलिसांना देण्यात आली व पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.