पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व सुभेदार ची राष्ट्रीय स्तरावर K. V. P. Y. शिष्यवृत्तीसाठी निवड

 




*पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व सुभेदार ची राष्ट्रीय स्तरावर K. V. P. Y. शिष्यवृत्तीसाठी निवड 

 चोपडा दि.०४ (प्रतिनिधी )---K. V. P. Y. म्हणजेच  किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. या शिष्यवृत्तीस भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागद्वारा निधी दिला जाणारा एक कार्यक्रम आहे, या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करियर करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. या परीक्षेस देशभरातील अनेक विद्यार्थी  सहभाग नोंदवतात . त्यापैकी  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या परीक्षेचे स्वरूप तोंडी व लेखी स्वरूपात असते. सदर परीक्षेत  चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी अथर्व अजय सुभेदार या विद्यार्थ्यांने आंतरराष्ट्रीय स्तरावर 680 रॅक प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी भारत सरकार तर्फे शिष्यवृत्ती मिळणार आहे. चोपडा  तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एकाच संस्थेतील 2  विद्यार्थ्यांनी ही चमकदार कामगिरी केली आहे.

या मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष  डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश  राणे, संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले , संचालक भागवत भारंबे, पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, व्ही. आर. पाटील, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे  प्राचार्य  मिलिंद पाटील, पंकज बाल संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा पाटील,पंकज इंग्लिश मीडियमचे प्राचार्य  संदीप वन्नेरे आदींनी  अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

         सदर विद्यार्थ्यास प्राचार्य मिलिंद पाटील,वस्तीगृहप्रमुख के. पी .पाटील,समन्वयक किरण चौधरी, कृष्णकुमार शुक्ला, इब्राहिम तडवी, भाग्यश्री बारी,आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने