दशक्रिया,गंधमुक्त विधीही मुलीकडून,समानतेची सर्वत्र चर्चा
गणपूर(ता चोपडा)ता 04: हिंदू रितिरिवाजाप्रमाणे आत्तापर्यंत आई वडिलांचे निधन झाल्यास मुलगाच चितेला अग्नी देऊन सर्व धार्मिक विधी करत होता.मात्र काळाने आता कूस बदलली असून प्रथा ,परंपराही काळानुरूप बदलू लागल्या आहेत.मुलगा आणि मुलगी आता समान झाली आहेत.येथे आईच्या निधनापूर्वीच भाऊ अपघातात जग सोडून गेल्याने मुलगीनेच चितेला अग्निडाग दिला,दशक्रिया विधीला डोक्यावरील केसांची लटही दिली आणि दशक्रियाविधी व गंधमुक्त चे सर्व धार्मिक विधीही पार पडले.मुलगा आणि मुलगीची समानता एकीकडे दिसत असतांनाच या धाडसी प्रथेची सध्या खान्देशात चर्चाच होत नसून कौतुकही होत आहे. येथील माजी उपसरपंच युवराज रघुनाथ पाटील यांच्या पत्नी दरुबाई यांचे अलीकडेच निधन झाले.त्यांच्या एकुलत्या मुलाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते.त्यांची मुलगी बबिता परेश बेहरे हिने प्रेतापुढे गावभर अग्नी धरून चितेला अग्निडाग दिला.दशक्रिया विधीला डोक्यावरील केसाची लट(काही केस)देऊन दशक्रिया व गंधमुक्त विधीही केला.त्यांच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा असून काळ बदलत असतांनाच प्रथा ,परंपराही त्या अनुषंगाने होऊ लागल्याच्या धाडसासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे...........गणपूर..अनेर नदी तीरावर दशक्रिया विधी पार पाडतांना सौ. बबिता परेश बेहरे