पंढरपुरात ह.भ.प.किशोर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ..*

 




*पंढरपुरात ह.भ.प.किशोर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ..*

*चोपडादि.०४ (प्रतिनिधी)* श्रीक्षेत्र,वेले ते श्रीक्षेत्र,पंढरपूर संकीर्तन पालखी पायी दिंडीचे संचालक ह.भ.प. किशोर महाराज (सोनखेडीकर) यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथेचा  पंढरपुरात (दि.१ जुलै पासुन दु.२ ते ५ या वेळात) वडगावकर नानाबुवा मठात प्रारंभ झाला.याप्रसंगी दिंडीचे प्रचारक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), ह.भ.प.भाईदास पाटील (मंगरूळ), कवी रमेश पाटील (आडगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

      कथेला गायक निलेश महाराज सोनखेडी, बापु महाराज सुकवड, सुदाम महाराज, अशोक महाराज दुसाने,हरीश महाराज काजीपुरा,तबलावादक भागवत महाराज नगरदेवळा, ऑर्गनवादक प्रवीण महाराज भातखेडा, विणेकरी गजानन बाबा होळदाणे, टाळकरी जयेश महाराज आखतवाडे, शांताराम पाटील, गोरख पाटील, संभाजी महाराज, विठुनाना हिंगोणे यांची संगीतसाथ लाभत आहे. साऊंडसिस्टिम शरद पाटील टाकरखेडा, चोपदार दिगंबर खैरनार दुसाने,आधार सोनगिरे वेले हे जबाबदारी सांभाळत आहेत. याप्रसंगी मधुकर पाटील वेले,सुकलाल कोळी मंगरूळ, मधुकर पाटील अंतुर्ली, गुलाबसिंग गिरासे देऊर, मोतीलाल पाटील दुसाने, नारायण पाटील रंजाने, शेखर पाटील वेडू पाटील आनंदा पाटील सोनखेडी, अरुण पाटील खलाणे, लीलाधर पाटील गडखांब यांचेसह अन्नक्षेत्र भोजनभंडारा महिला मंडळ ह.भ.प.निर्मला पाटील दाजीबानगर अमळनेर, सौ.निर्मलाबाई पाटील सोनखेडी, विपीता पाटिल दहिवद, निकमबाई चोपडा, मिराबाई पाटील मंगरूळ, प्रमिला पाटील दुसाने, मंगलाबाई पाटील दगुबाई पाटील मंगरूळ, विठाबाई सोनखेडी, प्रमिलाबाई पाटील दुसाने, कल्‍पनाबाई पाटील हातेड, कमलबाई गिरासे देऊर, मनुबाई पाटील दहिवद, वेणूबाई बाविस्कर घोडगाव प्रतिभा पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे. ह्या कथेचा पंढरपुरात शेकडों भाविकभक्तं व वारकरी मंडळी लाभ घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने