शिरपूर अ.भा.विद्यार्थी परिषदेचे तहसीलदारांना निवेदन
शिरपूर दि.१७(प्रतिनिधी)*संपूर्ण देशभरात होणाऱ्या हिंसाचारामागे असणाऱ्या लोकांचा लवकरात लवकर शोध घेऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी, असे निवेदन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपूर शाखे तर्फे तहसिलदारांना देण्यात आले.*
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या १६ राज्यांमध्ये हिंसाचार होत आहे, ज्यामुळे सामान्य नागरिक विनाकारण याच्या बळी ठरत आहे.
आंदोलनाच्या नांवावर दगड फेक, दंगली, राष्ट्रिय मालमत्तेचे नुकसान करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आहे.
आंदोलन, मोर्चाला कोणाचा विरोध नाही, पण जर आंदोलनाच्या नांवावर हिंसाचार होत असेल तर ही देशासाठी निंदनीय बाब आहे.
हिंसाचारामध्ये अनेक निर्दोष लोकांचा जीव गेला, १८, १९ वयाच्या विद्यार्थ्यांना वर गुन्हे दाखल झाले.
जे समाज कंठाक यामागे असतील, जे कोणी धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील अश्या नराधमांचा लवकरात लवकर शोध घेऊन प्रशासनाने त्यांच्या कठोर कारवाई करावी असे निवेदन आज अ. भा. वि. प शिरपूर शाखे तर्फे शिरपूरच्या माननीय तासिलदारांना करण्यात आले.
यावेळी जिल्हा संयोजक नयन माळी, शहरमंत्री, पवन राजपूत, हंसराज चौधरी, पृथ्वीराज लोहार, रा. स्व.सं. महाविद्यालय प्रमुख राज वाघ, लहू मिस्तरी, नक्षत्र पाटील, पार्थ राजपूत, पुष्पक जैन, अक्षय राजपूत, आदित्य कुलकर्णी, कार्यकर्ते उपस्थित होते