*जनता हायस्कुल चा निर्मल शिंदे शिंदखेडा शहरातून तीनही केंद्रात प्रथम*
शिंदखेडा दि.१७(प्रतिनिधी):*जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची अखंड परंपरा पूर्वव्रत ठेवत मार्च 2022मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एस एस सी च्या परीक्षेमध्ये जनता हायस्कुल च्या विध्यार्थीनी तीनही केंद्रातून अनुक्रमे प्रथम द्वतीय तृतीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले .*
*शिंदखेडा केंद्रातून प्रथम निर्मल प्रताप शिंदे 95.80% टक्के तर इशिता शालीकराव चौधरी व उत्कर्ष राहुल कचवे 94.20 %गुण मिळवत केंद्रातून द्वितीय तर तेजस्विनी जितेंद्र पाटील 93.60% गुण मिळवत सेमी माध्यमातून तीनही केंद्रातून तृतीय येण्याचा बहुमान पटकावला आहे*
*तसेच मराठी माध्यमातून प्रथम रुपाली शानाभाऊ सोनवणे 85.80% द्वितीय नंदिनी संजू जाधव 85.00 तर तृतीय नितीन मेल्या वळवी 84.40%टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत* ..**
*इ.10 वीला शाळेतून 197 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यात 90% टक्केच्या वरती 25 विद्यार्थी 80% वरती 112 विद्यार्थी तर 75 % वरती 19 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे *अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील. सचिव श्रीमती मीरा मनोहर पाटील*. *जेष्ठसंचालक श्री गोरख राघो पाटील. खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती एम डी बोरसे. पर्यवेक्षक श्री उमेश देसले सर्व शिक्षक शिक्षतेत्तर कर्मचारी बंधू भगिनी यांनी *मनःपूर्वक अभिनंदन केले* *