दहावीतही मुलींनीच मारली बाजी..महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा ९७ टक्के निकाल



दहावीतही मुलींनीच मारली बाजी..महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा ९७ टक्के निकाल

चोपडा दि.१७(प्रतिनिधी): माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२२ च्या आज जाहीर झालेल्या निकालात दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारत यशाचा झेंडा दिमाखाने फडकवला आहे. तालुक्यात एकूण शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

       महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ९७ टक्के लागला असून विद्यालयातून ९१.४० टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान नंदिनी अभय महाले या विद्यार्थिनीने पटकावला आहे. तर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी हे नेहा सचिन शुक्ल (९०.००), तनिष्क कैलास माळी (८९.४०) ठरले आहेत. विद्यालयातून एकूण ३१ विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी पटकावली आहे.

        यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, मुख्याध्यापक सुनील चौधरी, उपप्राचार्य डॉ आशिष गुजराथी, पर्यवेक्षक सुनील पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर वृंदाने अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने