यशवंत पब्लिक स्कुल मधून वैभवी माळी प्रथम
गणपूर(ता चोपडा)ता 17: वाघळी (ता 40गाव)येथील यशवंत पब्लिक स्कुल मधून एस एस सी परीक्षेत वैभवी कैलास माळी 92.40 टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली आली. शाळेचा निकाल 100% लागला असून सर्व विद्यार्थी 82 % पेक्षा जास्त गुण मिळवुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी,संचालिका जयश्री सूर्यवंशी,ऍड.बाळकृष्ण पाटील, मुख्याध्यापिका अनिता खंडेलवाल, प्रिती भोळे, गणेश अहिरे, सुलताना शेख वाहिद, मुकेश पाटील, अजय सोनवणे, रविराज पाटील,भारत पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले........फोटो...वैभवी माळी.