पंकज बोरोले यांचा आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केला सत्कार...

 





  पंकज बोरोले यांचा आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केला सत्कार...

      चोपडा दि.०५ (प्रतिनिधी):--पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक व रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे त्यात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते बांबू सेवक सन्मान ,94.3 FM  यांच्यातर्फे रियल इस्टेट एक्सलन्स अवार्ड , प्रेरणा दर्पण फाउंडेशन तर्फे दर्पण पुरस्कार 2022 व रोटरी उत्सव 2022 चे उत्कृष्ट व यशस्वी आयोजन केल्याबद्दल नाशिक विभागाचे शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे हे चोपडा दौऱ्यावर आले असता त्यांनी पंकज बोरोले यांना स्वतःच्या हाताने फेटा बांधून शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

        महात्मा गांधी महाविद्यालयातील कार्यालयात त्यांना बोलावून आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, सचिन धाबे ,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा

 प्रदीप निंबा पाटील आदी उपस्थित होते...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने