बाळगोपालांची सायकल रॅलीने दिला पर्यावरण संवर्धन संदेश
भडगांव दि.०५(प्रतिनिधी) - ओंकार विहार कॉलोनी येथे अंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल रॅलीचे चिमुकले मित्रांनी आयोजन करून रंगत आणली यावेळी चि. कृष्णा, रेयांश,भावेश, पार्थ,ओम श्रावणी यांनी ५ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी प्रा. संदिप पाटील यांनी सायकलींचे जीवनातील महत्त्व व आरोग्यासाठी सायकल प्रवास केल्याने उंची वाढते निसर्ग संवर्धन,शरीराचा सर्वांगीण व्यायाम होत असतो असे मार्गदर्शन केले यावेळी प्रा. सुरेश कोळी, विवेक शिरसाठ, राजेश पाटील यांनी कौतुक केले