आदिवासी विभागाच्या विकासासाठी मदतीला केव्हाही तयार- शिक्षक आ.डॉ.सुधीर तांबे डॉ.चंद्रकांत बालेला यांची भेट




आदिवासी विभागाच्या विकासासाठी मदतीला केव्हाही तयार- शिक्षक आ.डॉ.सुधीर तांबे
 .. डॉ.चंद्रकांत बारेला यांची भेट

 चोपडा ( प्रतिनिधी )नाशिक विभागाचे शिक्षक आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आज चोपडा दौऱ्यावर आले असता,त्यांनी येथील जनसेवा हॉस्पिटल येथे येऊन डॉ.चंद्रकांत बारेला यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी आदिवासी भागाच्या विकासासाठी कोणतीही मदत लागत असल्यास कधीही सांगावे मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.असा शब्द दिला,तसेच मुंबई आले की विधानभवनात या सविस्तर चर्चा करू असेही आश्वासन दिले.

डॉ.चंद्रकांत बारेला यांची काही दिवसांपुर्वीच आदिवासी प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली म्हणून आ.सुधीर तांबे यांनी डॉ.

बारेला यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीपभैय्या पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती नारायण पाटील,सचिन धाबे व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने