महाराष्ट्र पावरा डॉक्टर्स असो.च्या वतीने डॉ.चंद्रकांत बारेला यांचा गुणगौरव
चोपडा दि.०४( प्रतिनिधी )- येथील जनसेवा हॉस्पिटलचे संचालक, तथा आदिवासी विकास प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र पावरा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने
पावरा समाजातील महाराष्ट्रातील प्रथम डॉक्टर उदयसिंग पावरा यांच्या हस्ते शहादा जिल्हा नंदुरबार येथे परिवारासह गुणगौरव करून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ.चंद्रकांत बारेला हे आपल्या वैद्यकीय व्यवसायाला केवळ व्यवसाय म्हणून न बघता त्याला समाजसेवेचे व्रत म्हणून अडल्या नडल्या गोर गरीब लोकांसाठी मदतीला धावून जातात त्यांच्या या कार्यशैलीमुळेच त्यांची निवड ही महत्वाच्या आदिवासी विकास प्रकल्प समिती अध्यक्षपदावर झालेली आहे.या संधीचे सोने करत डॉ.बारेला जिल्हाभरातील आदिवासी पावरा समाजातील जनतेची सेवा करत आहेत, कोरोना काळात डॉ. बारेला यांनी सर्वच रुग्णांची
सेवा केली होती.यासर्वच समाजाभिमुख,समर्पित सेवेची दखल महाराष्ट्र पावरा डॉक्टर्स असो.ने घेत त्यांचा परिवारासह यथोचित मान देऊन सन्मान केलेला आहे,यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला त्यांच्या सौभाग्यवती डॉ.सौ.सोनाली बारेला डॉ.लक्ष्मी विजय बारेला यांचा यथोचित मान देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विजयसिंग पवार,डॉ.जितेंद्र भंडारी,डॉ.हिरा पावरा,डॉ. मणीलाल शेलटे,डॉ.गोविंद शेलटे,डॉ.कांतीलाल पावरा,डॉ. किसन पावरा,डॉ.अविनाश पावरा,डॉ.सुनील पावरा,डॉ. श्रीकांत पावरा यांनी केले.शहादा येथे दि.२९ मे रोजी हा नेत्रदीपक सोहळा पार पडला.