बालमोहन ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल.. विज्ञान शाखेत आर्यन पाटील सर्वप्रथम
चोपडा दि.०९(प्रतिनिधी): अमर संस्था संचलित बालमोहन ज्युनिअर कॉलेज चोपडा यांच्या शंभर टक्के निकाल लागला आहे. इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत 344 विद्यार्थी प्रविष्ट होते विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामध्ये प्रथम आर्यन संजय पाटील 89.83 द्वितीय यश संजय जोशी 87.17 पुन्हा द्वितीय कौस्तुभ सुनील माळी 87.17 तृतीय खुशी परेश शहा 84 .50 या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे .
आर्ट्स शाखेत 137 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होते शाखेचा निकाल 97.3 टक्के लागला आहे प्रथम वैशाली भारसिंग निगवाडे 78.67 दुसरा क्रमांक राहुल भागवत चौधरी 71.83 तृतीय नम्रता सतीश पाटील 71. 50 या विद्यार्थ्यांनी मिळवला तसेच वाणिज्य शाखेत 108 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते वाणिज्य शाखेचा निकाल 99.07 टक्के आहे प्रथम रोहित सुनील शिंदे 70.33 दुसरा क्रमांक रोहित ज्ञानेश्वर चौधरी 75.83 तृतीय कुणाला आनंद साळुंखे 74.83 या विद्यार्थ्यांनी मिळवले असून सर्व यश संपादन केलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब श्री चंद्रकांत गुलाबराव पाटील उपाध्यक्ष माननीय भाऊसाहेब श्री मनोज भाऊ चित्रकथी सचिव माननीय दादासाहेब श्री दीपक जोशी सर तसेच जेष्ठ संचालक आबासाहेब डी.बी.पाटील साहेब व सर्व कार्यकारी मंडळ तसेच कॉलेजची व्यवस्थापक सनमानिय दादासाहेब श्री विजय दीक्षित प्राचार्य श्रीमती प्रीती सरवैयया व सर्व शिक्षक वृंद व शिक्षेकत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.