*पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासींना बेघर करणार काय?वनदावेदारांचे अतिक्रमण काढणे थांबवा अन्यथा जन आक्रोश आंदोलन.. संजीव शिरसाठ
चोपडा दि.०८(प्रतिनिधी):- पावसाळ्याच्या तोंडावर अतिक्रमणाच्या नावाखाली आदिवासींच्या झोपड्या तोडून बेघर करून उघड्यावर आणू नका.. प्रशासनकर्त्यांनो जरा माणूसकी जपा असा आक्रोश मोर्चा काढत तहसीलदारांना आदिवासींच्या जमावाने शेतकरी शेतमजूर पंचायतचे जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
दिनांक ७/६/२०२२ रोजी वनदावे दारांचे अतिक्रमणं व घरे तोडणे तत्वरीत थांबविण्यात यावे यासाठी शेतकरी शेतमजूर पंचायत चे जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ याच्या नेतृत्वाखाली मा तहसिलदार अनिल गावित साहेब यांना निवेदन देण्यात आले. चोपडा,यावल तालुक्यातील आदिवासी चे वनदावे तहसिल, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्या कडे वनदावे प्रलंबित,अपिलार्थी,अंशदा पात्र, असे असतांना, आदिवासींचे झोपडी वजा घर अतिक्रमण च्या नावाखाली तोडण्यात येत आहे.हा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत.आता पावसाळ्यात बेघर आदिवासी कुठे जातिल? मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्वरीत अतिक्रमण काढणे बंद करा. अतिक्रमण काढण्या आधी वन व महसुल अधिकारी यांनी आदिवासी समवेत चर्चा करायला हवी होती.तसे कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. तरी वन व महसुली अधिकारी यांनी मा सौ लताताई सोनवणे आमदार तथा वनहक्क समिती महाराष्ट्र राज्य व आदिवासी वनदावेदार यांचे समवेत.एक बैठक तत्वरीत घेण्यात यावी.आणि आदिवासीं वरिल होत असलेल्या अन्याय तत्वरीत थांबवावा असे मत संजय शिरसाठ यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी संजीव शिरसाठ, ताराचंद पाडवी, देवसिंग पावरा,गणदास बारेला,यासु बारेला,सौ नाजाबाई पावरा,बाटीबाई बारेला, नर्साबाई पावरा,नानीबाई पावरा,अनिता पावरा,सकुबाई बारेला,बायकाबाई बारेला,सालंकीबाई बारेला,दोयऱ्याबाई बारेला,अंबिंबाई बारेला,मधु भिल,गेलसिंग बारेला,बालसिंग बारेला,बियानु बारेला,नका बारेला, गजिराम पावरा,गुडा बारेला,दगडु बारेला,पिंटु पावरा, प्रताप बारेला,भावलाल बारेला, राजेश बारेला, जगदिश बारेला,रायसिंग बारेला, बिहारी बारेला,राजु बारेला,प्रेमसिंग बारेला यांच्या सह शेकडो आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते.