*जळगाव उपनिबंधक कार्यालयातील दोघे लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात*
जळगाव दि.०८(प्रतिनिधी महेश शिरसाठ): सहकार दप्तरी घराची नोंद करून ताबा पावती तक्रारदाराला देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागणी करणाऱ्या जळगावातील उपनिबंधक सहकारी संस्थेचे सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी (54, रा. प्लॉट नं.16, आशा बाबा नगर, जळगाव) व सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधाकर राणे (48, रा.गट नं. 43, प्लॉट नं.141, गणेश कॉलनीजवळ, जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने दुपारी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
40 वर्षीय पुरुष तक्रारदार यांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले असून घराची दप्तरी नोंद घेवून त्याबाबतची ताबा पावती तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांनी 18 मे 2022 रोजी पंचांसमक्ष कार्यालयातच पाच हजारांची लाच मागणी केली होती व त्याबाबत एसीबीकडे अहवाल आल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी दोघांना अटक केली.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, पोलिस नाईक सुनील शिशरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.