*करवंद गोरक्षनाथ विकास सोसायटीवर नाभिक समाजातील महिला ज्योतीताई सोनवणे यांची बिनविरोध निवड.
*त-हाडी,ता.शिरपूर दि.१४( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे) तालुका शिरपूर जिल्हा धुळे गोरक्षनाथ विकास सोसायटी करवंद येथे आपल्या नाभिक समाजातील महिला ज्योती ताई साहेब सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्याच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष श्री भीमराव नारायण वारुळे, राज्य कर्मचारी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री भरत दादा शिरसाठ, जिल्हा सचिव नानासाहेब श्री बी के सूर्यवंशी, परिसर अध्यक्ष श्री प्रवीणजी सैदाणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ पवार, महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री विशाल अण्णासाहेब चित्ते आदिंनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
