अनेर काठच्या १७ गावातील धोक्यात आलेली पिके बचावली.. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे पाणी आवर्तन सोडले.. परिसरात बळी राजा सुखावला*

 *अनेर काठच्या १७ गावातील धोक्यात आलेली पिके बचावली.. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे पाणी आवर्तन सोडले.. परिसरात बळी राजा सुखावला* 

चोपडा दि.१४ (प्रतिनिधी)अनेर काठच्या १७ गावातील शेती पिके पाण्याअभावी धोक्यात आली असतांना नदीपात्रात ताबडतोब पाणी सोडण्यासाठी  आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी ६मे  रोजी च्या खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री  ना.गुलाबराव पाटील  तसेच जिल्हाधिकारी  धुळे, पाटबंधारे विभाग धुळे यांच्या कडे  मागणी लावून धरल्याने  जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित आदेश देऊन अनेर नदीत आवर्तन सोडल्यामुळे बळीराजाच्या पिकांचे  नुकसान होता होता वाचले आहे परिणामी शेतकरी राजा जाम खुश झाला असून आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.


   अनेर नदी काठावरील  कष्टकरी बळीराजाच्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात होत नव्हता त्यामुळे  पिकांची भीषण अवस्था होऊ पाहत होती याचे गांभीर्य ओळखून आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे ह्यांनी  धुळे पाटबंधारे विभाग

कार्यकारी अभियंता , धुळे व जळगाव जिल्हाधिकारी,  तसेच  ६ मे रोजी जिल्हयाच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम बैठकीत अनेर धरणांचे पाणी अनेर नदीत सोडण्याची मागणी लावून धरली त्यानूसार संबंधितांनी  तात्काळ लक्ष घालून अनेर धरणातून अनेर नदीत पाणी आवर्तन सोडले त्यामुळे  १७/१८ गावातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान  थांबले आहे. 

 दरम्यानअनेर नदी काठावरील चोपड़ा तालुक्यातील १७ गावांमध्ये शेतातील व गावातील पाणीपुरवठा कुपनलिकांची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत असून ऐन उन्हाळ्यात अनेर काठावरील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पुरेसे पाणी देण्यास अनेक अडचणी येत होत्या. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याच्या मार्गावर होते   अनेर धरणात सध्या ४० टक्के इतका पाणी साठा असून अनेर नदीकाठावरील गावांची पाणीपातळी वाढण्यासाठी अनेर धरणाचे पाणी अनेर नदीत सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या कडे केली होती .त्याअनुषंगाने   आमदार उभ सौ लताताई सोनवणे यांनी संबंधितांकडे पाठ पुरावा करून प्रश्न मार्गी लावून घेतला. या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने ताईंसाहेबांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने