आमदार सौ लताताई सोनवणे यांचे हस्ते घोडगाव येथे शेत पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन शुभारंभ
चोपडा दि.१४(प्रतिनिधी):दिनांक 13 मे रोजी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत घोडगाव येथे शेत पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन सोहळा आमदार सौ लताताई सोनवणे यांचे हस्ते संपन्न झाला. विधानसभा मतदार संघाचे माननीय आमदार सौ लताताई प्रा.चंद्रकांत सोनवणे मा आमदार तथा रावेर लोकसभा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी जि प सदस्य हरीश पाटील माजी उपसभापती एम. व्ही पाटील सर ,तालुका संघटक सुकलाल कोळी ,युवा सेना तालुकाप्रमुख गोपाल भाऊ चौधरी, उपतालुकाप्रमुख प्रवीण पाटील, कुसुंबा सरपंच भाईदास भिल, सुनील भाऊ कोळी , किशोर भाऊ दुसाने, गणेश पाटील श्रीराम कोळी, गलंगी चे सरपंच सौ शितलताई देवराज , वेळोदे माजी उपसरपंच श्री बापू मोरे, उपविभाग संघटक, अशोक पवार, सुनील भाऊ पाटील वडोदा, विठू सर, आसिफ जी मनियार, गोपाल भाऊ देवराज तसेच घोडगाव गावातील असंख्य शेतकरी बांधव, अनेर परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
