जंगलात राहून वाघाशी..अन महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करू नका अशी डरकाळी फोडणाऱ्या धर्मवीर आनंदजी दिघे घरा घरातून घडवा..शिवसेनेचे धडाकेबाज माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे जोरदार आवाहन..


जंगलात राहून वाघाशी..अन महाराष्ट्रात राहून माझ्याशी  वैर करू नका अशी डरकाळी फोडणाऱ्या धर्मवीर आनंदजी दिघे घरा घरातून घडवा..शिवसेनेचे धडाकेबाज माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे जोरदार आवाहन..

 ✍️ आमदार दाम्पत्य चित्रपट बघायला बसले सर्व सामान्य जनतेसोबत..

✍️ चोपड्याच्या इतिहासात अनदेखा प्रसंग पहिल्यांदाच प्रत्यक्षात..

✍️ पत्रकार बांधव व महिलांना बाल्कनीचा सन्मान

चोपडा दि.१८(प्रतिनिधी): कुठल्याही बॅंकेत  साधे अकाउंट नसलेला अन् दोन्ही खिसे रिकामे असलेला  जगातील सर्वात श्रीमंत माणूस या महाराष्ट्राने पाहिलेला आहे.डोक्यात टोपी घालून नाही तर डोक्यात जिहाद  घेऊन जगणारा आमचा शत्रू आहे.माणूस जपण्या इतका कोणताही धर्म मोठा नाही असं हृदय पिळवटून टाकत समजावणारं व्यक्तीमत्व म्हणजे धर्मवीर आनंद चिंतामण दीघे होय. ठाण्याच्या टेंभी येथील धगधगत्या अग्निकुंडाची धगधगती भगवी मशाल हाती घेऊन निघालेल्या शिवसैनिकांने दींन दुबळे असो वा दलित पीडीत असो सर्वांनाच आपल्या आनंदाश्रमात बसून न्याय देणाऱ्या न्यायदेवतेची कहानी म्हणजेच "धर्मवीर" चित्रपट होय.जंगलात राहून वाघाशी..आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचे नाही अशी डरकाळी फोडून भल्या भल्याची हवा काढून टाकणारा शिवसैनिक महाराष्ट्राची 'शान'आहे.सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दीघेही असतात अशी जोरदार प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांनी दिली.

 ते चोपडा येथे आशा टॉकीज सिनेमा गृहात शिवसैनिकांनी मोफत दाखविलेल्या "धर्मवीर" चित्रपट प्रदर्शनानंतर जमलेल्या प्रचंड जनसमुदायपुढे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

शिवसैनिकांची जनतेशी जुळलेली नाळ ही काही आत्ताची नसून  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतून धगधगत्या भट्टीतून निघाल्या लोहाप्रमाणे मजबूतीने तयार झाली आहे.ठाण्याच्या टेंभी च्या दरबारात पासून प्रारंभ झालेल्या धगधगणाऱ्या मशालीने आख्खा महाराष्ट्र उजळून निघाला आहे.अंगावर शहारे यावेत अशा कूक्रमींच्या नांग्या ठेचण्याचे काम आनंदाश्रमाच्या दरबारातून होतं होते . न्यायपालिकेच्या दरबारात हार झाल्यानंतर मात्र आमचा धर्मवीर न्यायदान करीत होते.त्यांच्या भूमिकेने अनेकांच्या डोळ्यांतून धारा वाहत होत्या. आई-बहिणीवर अत्याचार झाल्यास शिवसैनिकांचे अंगातील रक्त सळसळून उठते हे दृश्यम आमच्या शिवसैनिकांच्या नसानसात आजही आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.असेहि प्रा. सोनवणे यांनी स्पष्ट केले.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत त्यांचें शिष्य आनंद दीघे साहेबांचे गुरू प्रेम मन हेलावून टाकणारे आहे.त्यातच एकनाथराव शिंदे साहेबांवर कोसळणारे दूर्दैवी संकट म्हणजे पायाखालची वाळू सरकणारी अशीच आहे.तरीही एवढ्या मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी ऊर्जा देणारे महानायक म्हणजे असा धर्मवीर असेच म्हणावे लागेल अशी पुष्टीही प्रा.सोनवणे जोडली.

हा चित्रपट प्रत्येक शिवसैनिकांना नव्हे तर हर एक धर्म वीराला प्रेरणास्रोत आहे.नुसते बघण्यावर घेऊ नका हा आपला इतिहास आहे न्यायासाठी, जनहितासाठी पेटून उठत घरा-घरातून आनंद दीघे साहेब बना वा बनवा असे आवाहन करीत. सगळेच राजकारणी सारखें नसतात काही आनंद दीघेही असतात असेही त्यांनी सांगितले.

अनेक दशकांपासून शिवसेनेचे हिंदुत्व संपूर्ण राज्याने पाहिले आहे. हिंदुत्व ही दाखवण्याची वस्तू नसून ते मनगटात आणि हृदयात असावे लागते. ते हिंदुत्व शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकत्यांमध्ये ओतप्रोत भरले आहे. आता दुसऱ्यांनी हिंदुत्व दाखवून त्याचा नाद करू नये  अशा शब्दात माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली.

..........................................................................

 *आमदार बसले जनतेच्या रांगेत.. पत्रकार व महिलांना बाल्कनीचा सन्मान* 

दरम्यान, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांनी चोपडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्यां सोबतीने धर्मवीर हा चित्रपट हा फर्स्ट क्लासमध्ये बसून जनतेत मिसळून बघितल्याने  अनेकांनी आमदार दाम्पत्याच्या या प्रकाराचे मनोमन आभार मानले."ऐसा नेता होणे नाही" असं म्हणत जनता आणि लोकसेवक एकत्र आणि तेही फर्स्ट क्लास मध्ये बसून चित्रपट बघण्याचा प्रसंग चोपडयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहावयास मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या...यात मात्र पत्रकार बांधवांसाठी  व स्त्रियांसाठी बाल्कनीत "व्हिआयपी" व्यवस्था करुन मान देण्यात आला होता. 

......................................................................

याप्रसंगी आमदार सौ.लता चंद्रकांत सोनवणे,माजी आमदार प्रा. चंदक्रांत सोनवणे, श्यामकांत सोनवणे जिल्हा बँकेचे व्हाइस ,शिवसेनेचा युवा चेहरा सागरभाऊ ओतारी, महिला आघाडीच्या रोहिणी पाटील, महिला तालुका प्रमुख मंगला पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्रर पाटील ,आशा टॉकीजचे संचालक अनिल अग्रवाल पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, नगरसेवक किशोर चौधरी, पं.स.सदस्य एम. व्ही. पाटील, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक भैय्या पवार, नगरसेवक प्रकाश राजपूत, नगरसेवक महेंद्र धनगर, नगरसेविका संध्या महाजन,एक.के.गंभीरसर, सुनील बरडिया, पंकज जैन,सुनील आबा पाटील ,नंदू गवळी,नितीन चौधरी,गोपाल चौधरी, प्रवीण जैन, दीपक चौधरी, उप प्रमुख वासुदेव महाजन,  मंगेश पाटील, बबलू पालिवाल, अनुप जैन ,यांचेसह शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने