विटनेर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी दिलीप पाटील तर व्हाईसचेअरमनपदी नारायण कोळी अविरोध
चोपडा दि.१८(प्रतिनिधी):तालुक्यातील विटनेर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप पंढरीनाथ पाटील यांची तर व्हाईसचेअरमन म्हणून नारायण तोताराम कोळी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन इंदिराताई पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट व पॕनल प्रमुख सदाशिव बाबूराव पाटिल, भानुदास पाटिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, माजी उपसरपंच मनोहर पाटिल, संचालक भिका पाटील, आत्माराम पाटील, मधुकर पाटील, दंगल कोळी, युवराज पाकळे, भरत पाटील, शाम पाटील, मच्छिंद्र पाटील, लता पाटील, अनिता पाटील तसेच निलाचंद पाटिल, हुकुमचंद पाटील, किशोर चौधरी, कैलास पाटील, चेतन पाटील, संभाजी पाटील आदिंसह इतर ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटिल, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाका माजी चेअरमन घनश्याम पाटील,चोपडा पिपल्स बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, कृऊबा संचालक सुनिल जैन, पिपल्स बँक संचालक नेमीचंद जैन आदि नेते मंडळींनी अभिनंदन केले आहे. सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विकास सोसायटी सचिव अशोक पाटिल व संदीप पाटिल यांनी परीश्रम घेतले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.बी.विसपुते व एस,व्ही.बेहरे यांनी काम बघितले.
