वाणिज्य विभागातर्फे स्वागत व निरोप समारंभ संपन्न
भडगाव दि.०८(प्रतिनिधी)-येथील एस.आर.एन.डी. महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून तृत्तीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन बी.एन.बापू सेमिनार हॉल विभागात स्वागत करण्यात आले तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यां कडून तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन पूढच्या वाटचाली करीता शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डाॅ. एन. एन. गायकवाड सर होते. प्रमूख वक्ते म्हणून प्रा.एल.जी. कांबळे व महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागांचे समंवयक प्रा.डॉ.एस.डी.भैसे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ बी .एस. भालेराव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमूख मा. प्रा. डाॅ. एस.एन. हडोळतिकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी प्रा.एस. ए.कोळी व प्रा.डॉ.गजानन चौधरी यांनी पार पाडली.सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतीत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. प्राचार्यां नी विद्यार्थ्यांना वेळ व काळाचे भान ठेवून निर्णय घ्या असे सूच विले प्रा.एल.जी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही मदतीस महाविद्यालयाची दारे तूमच्या करीता उघडी आहेत हे सांगीतले. प्रा. सुरेश कोळी व चौधरी सरांनी विद्यार्थ्यांचे यश चिंतले तर प्रा.डॉ.एस. डी. भैसे यांनी पूढील जीवनात यशस्वी होण्याचा व आपल्या पायावर उभे राहण्याचा गुरुमंत्र दिला.शरद चव्हाण,शेखर बोरसे, श्वेता चौधरी इ. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रा.डॉ.सी.एस पाटील प्रा आर.एम. गजभिये प्रा.डॉ.डी.एच तांदळे,प्रा.डी.ए.मस्की प्रा.डॉ.ए. एम.देशमुख,प्रा.डॉ. देवरे,प्रा. वाकोडे व प्रा.वाघ व शिक्षेकेतर कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचे स्वागत गीत विद्या महाले व पूजा पाटील तर सूत्रसंचालन ज्योती पाटील ने अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने केले तर आभारप्रदर्शन कु.हेमांगी सूर्यवंशी या विद्यार्थिनीने केले. यावेळी तनुजा पाटील,नेहा पाटील, जागृती पाटील, रितू पाटील, सुजाता पाटील, श्वेता चौधरी,प्रथमेश खैरनार, कौस्तुभ चौधरी,निलेश महाजन,दर्शन पाटील,शेख अजिमोद्दीन,मयूर कोतकर,सोनू पाटील,सुमित महाजन, सिद्धार्थ पाटील होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली व अल्पोपहार देण्यात आला.