वर्डीच्या ग्रामसेवक भाऊसाहेबांनी घेतली ११ हजारांची लाच.. अन्टीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडून केली कारवाई*

 



*वर्डीच्या ग्रामसेवक भाऊसाहेबांनी  घेतली ११ हजारांची लाच.. अन्टीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडून केली कारवाई*
चोपडा दि.०९(प्रतिनिधी)   तालुक्यातील वर्डी येथील ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहीदे यांनी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामाचे बिल अदा करणेकामी तक्रारदार सबकाँट्रॕक्टर यांच्याकडे लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना त्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्डी ग्रामपंचायत येथे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत निधीतून तक्रारदार यांनी सब-काँट्रॕक्टर म्हणून गटार व ढापे बांधण्याचे काम पुर्ण केले असुन सदर कामाचे बिल अदा होणेकामी ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहीदे रा. प्लॉट न 65 बोरोले नगर 2 चोपडा जि. जळगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांनी केलेल्या कामाचे बिल अदा करणेकामी पंच व साक्षीदारांसमक्ष 12500/- रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 11,000/- रु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारताच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक नारायण न्याहळदे, वाचक, पोलीस उपअधिक्षक सतीश भामरे आदिंच्या मार्गदर्शनाखाली व  धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर व पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, मोरे व सुधीर मोरे आदिंनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने