तापीनदीतील कच्चा रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांचे हाल..जगन्नाथ बाविस्कर.





 तापीनदीतील कच्चा रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांचे हाल..जगन्नाथ बाविस्कर

 *चोपडा दि.०९ (प्रतिनिधी)* खेडीभोकरी ते भोकर दरम्यान तापीनदीत माती मुरूम पाईप टाकून बनवण्यात आलेला कच्चा रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील प्रवाशांसह लहान-मोठे वाहनधारकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.याठिकाणी सालाबाद प्रमाणे हंगामी लाकडी पूल बनविण्यात आला असता तर हा त्रास झाला नसता.हा कच्चा रस्ता वाहुन जाण्याची शक्यता गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी आधीच वर्तविली होती.

       गुळीनदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने कोळंबा येथील अवधूत बाबा मंदिरापासून पाण्याचा प्रवाह तापीनदिच्या विरुद्ध दिशेने भोकर भादली पर्यंत जात असतो.तिकडे पाण्याची पातळी पूर्ण झाल्यानंतरच खालील कठोरा पळसोद गावाकडे पाणी वाहत असते.पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे नदीतील कच्चा रस्ता पाण्याखाली आल्याने वाहून गेला आहे.त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे खेडीभोकरी कडील लहानमोठे चारचाकी वाहनांना एैनवेळेस अडावद धानोरा मार्गे जळगांव तसेच भोकर कडील वाहनांना विदगांव मार्गे चोपडा असे फिरून जावे लागत आहे.जर याठिकाणी हंगामी लाकडी पूल राहिला असता तर वाहनधारकांना त्रास झाला नसता,अशी संतप्त प्रतिक्रिया पंचक्रोशितील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

..............................................

*पुढील वर्षी हंगामी लाकडी पूल बनविण्यात यावा..*

तापीनदीत हंगामी लाकडी पूल बनविण्यात यावा अशी आमची आग्रही मागणी होती.त्यानुसार ह्यावर्षी तात्पुरता कच्चा रस्ता बनविण्यात आला होता.तोच रस्ता वाहुन गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित विभागाने पुढील वर्षी येथे हंगामी लाकडी पूल बनवावा.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

           *-- जगन्नाथ बाविस्कर* 

माजी संचालक,मार्केट कमिटी चोपडा.

...............................................

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने