खा. रक्षाताई खडसे यांच्या पाच दिवशी दौऱ्यामध्ये अनेर परिसरात ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्याशी मन की बात
गलंगी, ता. चोपडा दि.०९(प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी) चोपडा तालुका दौऱ्यानिमित्त आज रोजी खासदार रक्षाताई खडसे यांची गलंगी घोडगाव वेळोदा कुसुंबा अजांती सिम वाळकी वडोदा विटनेर गणपुर भवाळे व अनेर परिसरातील विविध ग्रामपंचायत यांना भेट देऊन स्थानिक लोक प्रतिनिधी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच बूथ प्रमुख ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधून गावातील विविध विकास कामांबाबत व अडीअडचना विषयी निवेदन स्वीकारून केंद्र सरकारच्या विविध योजनांची बाबत माहिती देऊन योजनेच्या लाभार्थ्यांची चर्चा केली .
तसेच गावातील प्रतिष्ठित माझी पंचायत समिती सभापती सिताराम बापू देवराज यांच्या व बूत प्रमुखांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली खासदार रक्षाताई खडसे यांच्या आभार मानले व भेट दिल्याने ग्रामस्थांनी यांचे जल्लोषात स्वागत केले चोपडा तालुका च्या चौथ्या दिवशी अनेक परिसरातील सर्व गावांना सदिच्छा भेटी देऊन गावातील अडचणीतील समजून निवेदन स्वीकारले
व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिले असून अनेर नदीला आवर्तन सोडण्यासाठी धुळे येथील जिल्हाधिकारी यांना ब्रह्म दुनिया वरून अनेर परिसरातील
नदीकाठावरती गावातील गुरेढोरे यांची व शेतकऱ्यांची प्रसिद्धी पाहून माहिती दिली असल्याने संबंधित अधिकाऱ्याने दोन ते तीन दिवसात अनेर नदीला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह तालुकाध्यक्ष पंकज पाटील जिल्हा सरचिटणीस मनोज सनेर प्रकाश पाटील भरत सोनगिरी रवींद्र देवराज उपसरपंच रंगराव सिताराम देवराज ग्रामपंचायत सदस्य विश्वासराव रायसिंग गोपाल देवराज किशोर देवराज भगीरथ देवराज संतोष देवराज किशोर देवराज देविदास देवराज ग्रामसेवक रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होते