घाटकोपर पश्चिम विभागातील अमृत नगर सर्कल येथील सुशोभीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

 



घाटकोपर पश्चिम विभागातील अमृत नगर सर्कल येथील  सुशोभीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाट
न 

मुंबई दि.०३ (शांताराम गुडेकर ) घाटकोपर पश्चिम येथील स्थानिक नगरसेविका डॉ.अर्चना भालेराव आणि मा.नगरसेवक श्री. शिवभक्त संजय भालेराव  यांच्या प्रयत्नाने घाटकोपर पश्चिम एन वॉर्ड  विभागातील अमृत नगर सर्कल येथील  सुशोभीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे मंत्री श्री. आदित्य ठाकरे- युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री, राजशिष्टाचार आणि अनिल परब - परिवहनमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी विभाग प्रमुख,नगर सेवक, शाखाप्रमुख युवासेनेचे पदाधिकारी,ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षणच्या वतीने सुनील बागवे यांच्या हस्ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांचा शाल, पुष्पकरंडक देऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने