कु.रोशनी अशोक सुतार हिनचे एम.पी.एस.सी.परीक्षेमध्ये घवघवीत यश .. आरटीओ पदी नियुक्ती
मुंबई दि.०३एप्रिल (शांताराम गुडेकर ) : कु.रोशनी अशोक सुतार( राहणार -चंदगड) हिने एम.पी.एस.सी.परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले असून तिची निवड आर.टी.ओ(R. T. O.)पदी झाली आहे. तिची या पदी निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश सातवणेकर सर,अशोक कदम, मुरलीधर बल्लाळ, संजय खासणीस, विनायक पाटील,राहुल चौगुले, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.