*श्रीनाटेश्वर पिक संरक्षण सह.सोसा.कडून मंदिर जिर्णोध्दारासाठी देणगी सुपूर्त..*
लासुर ता.चोपडा दि.०३(प्रतिनिधी) येथील श्री.नाटेश्वर पिक संरक्षण सहकारी सोसायटी लासुर च्या संचालक मंडळाकडून आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी कामे करण्यास हातभार लावला जात आहे,या संस्थेने आपल्या जनरल सभासदांना लाभाषं म्हणून पाण्याचे जार वाटप केलेत, संस्थेची इमारत दुरुस्ती केली,तसेच सामाजिक बांधीलकी म्हणून 'स्वर्ग रथ' ची सुविधा ही सुरु केली आहे,
दि.2 एप्रिल 2022 शनिवार रोजी 'गुढी पाडव्याच्या शुभ दिनी या संस्थेने लासूर गाव व पंचकोषीचे आराध्य दैवत श्री.क्षेत्र नाटेश्वर मंदिराच्या कळस जिर्णोध्दासाठी आर्थिक मदत म्हणून 5555 रुपये तसेच लासूर गावातील पूरातन मंदिर 'श्रीराम मंदिर' बांधकामासाठी ही 5555 रुपये देणगी संचालक मंडळाने श्री क्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिर कळस जिर्णोध्दार देखरेख समिती तसेच श्री.राममंदिर जिर्णोध्दार देखरेख समिती च्या सन्मा.पदाधिकार्यांकडे दिली,
यावेळी लासूर येथील 'नम्रता पॅनलचे नेते श्री.अमृतराव दत्तात्रेय वाघ यांनी या संस्थेच्या भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी कारभारामुळे या संस्थेने उत्कृष्ठ अशी कामगिरी बाजावली आहे म्हणून सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले, तसेच 'नम्रता पॅनलचे प्रमुख श्री प्रा.ए के गंभीर यांनी ही श्री.नाटेश्वर पिक संरक्षण सह.संस्थेच्या तसेच *नम्रता पॅनलच्या'* अधिपत्याखाली असलेल्या गावातील ग्राम पंचायत,लासुर विविध कार्यकारी सह.सोसा.संत सावता माळी पतसंस्था आदि संस्थामध्ये कर्तव्यदक्ष पदाधिकार्यामुळे निष्पक्षपाती कार्य व गावाचा विकास होत आहे, असे तोडभरुन कौतुक केले,
या वेळी 'नम्रता पॅनलचे' प्रमुख द्वयी श्री.अमृतराव वाघ,प्रा.ए.के.गंभीर,जेष्ट मार्गदर्शक तसेच संत सावता माळी पंतसंस्थेचे संचालक शंकरनाना माळी, श्रीराम मंदिर जिर्णोध्दार समितीचे प्रमुख श्री.हिंमतराव माळी,विक्रम जावरे,अजय पालिवाल,विजय पाटील, तसेच श्री.क्षेत्र नाटेश्वर मंदिर जिर्णोध्दार समितीचे प्रमुख श्री.अरुण पालिवाल,श्रीराम पालिवाल,सुरेश महाजन,ओमप्रकाश पालिवाल,उपेंद्र पाटील,अजय पालिवाल,दिलिप पालिवाल, यांना श्री.नाटेश्वर पिक संरक्षण सहकारी सोसा.चेअरमण श्री.गोकुळ रतन माळी,व्हाॅ.चेअरमण श्री.पिंताबर शामराव कोळी,संचालक अरुण पाटील, लिलाधर पाटील,दिनकर पवार ,जिजाबराव पाटील,सुभाष माळी,युवराज माळी,मुकेश राजकुळे,शिरीष पाटील,
लासुर विकास सह.सोसायटीचे चेअरमण श्री.विठ्ठल चिंतामण पाटील, लोकनियुक्त सरपंच प्रतिनिधी श्री.किशोर सुकदेव माळी,संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष नरेंद्र माळी,ग्रा.पं.सदस्य पुंडलिक माळी,संचालक अशोक बाविस्कर,सोमनाथशेठ सोनार,चंद्रकांत पाटील,गोरख पाटील,
भरत सोनगिरे आदि पदाधिकारी व सन्मा.मंडळी तसेच संस्थेचे सचिव निलेश तडवी,कर्मचारी वर्ग,उपस्थित होते..