चोपडा येथील वसतीगृहास डॉ.बारेला यांची सदिच्छा भेट : समाधान व्यक्त

 




चोपडा येथील वसतीगृहास डॉ.बारेला यांची सदिच्छा भेट : समाधान व्यक्त 

चोपडा,दि.२१ ( प्रतिनिधी )  शहरातील धनवाडी रोड स्थित असणाऱ्या आदिवासी नवीन मुलांच्या वसतीगृहास आदिवासी प्रकल्प समिती अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अचानक सदिच्छा भेट देत पाहणी केली.वसतीगृहात मुलांसाठी असणाऱ्या सोयी,सुविधा,जेवण आदींबद्दल समाधान व्यक्त केले.

डॉ.चंद्रकांत बारेला यांनी यावेळी आदिवासी मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणींवर चर्चा केली.विद्यार्थ्यांना रिडींगहॉल,सुसज्ज असे वाचनालय मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहील असा शब्द यावेळी समिती अध्यक्ष डॉ.बारेला यांनी आदिवासी मुलांना दिला.डॉ.चंद्रकांत बारेला यांनी आदिवासी मुलांसमवेत जेवण केले.जेवणाच्या क्वालिटी बद्दल व इतर सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षक खंबायत,कोळी यांनी डॉ.बारेला यांचे शाळेच्या वतीने स्वागत करून विस्तृत माहीती दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने