युवक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जीपीएस परिवारातर्फे जि.प.सदस्य प्रतापरावजीं गुलाबरावजीं पाटील यांचा सत्कार*



 *युवक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जीपीएस परिवारातर्फे  जि.प.सदस्य प्रतापरावजीं गुलाबरावजीं पाटील यांचा सत्कार*

पाळधी दि.२१(प्रतिनिधी) युवक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जीपीएस परिवारातर्फे जि.प.सदस्य श्री दादासाहेब प्रतापरावजीं गुलाबरावजीं पाटील यांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला.

 सविस्तर वृत्त असे की जीपीएस कँम्पस,पाळधी चे अध्यक्ष माननीय दादासाहेब प्रतापरावजीं गुलाबरावजीं पाटील यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स यांच्यातर्फे युवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वसामान्यांच्या मदतीला नेहमी तत्पर असणारे , तसेच कोविड काळात गरजू रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या सर्व प्राथमिक गरजा पूर्ण करणे , कोवीड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांची अडचणी व सुविधा यांची विचारपूस करून   त्यांना मानसिक धीर देण्याचे कार्य मा श्री प्रतापराव पाटील यांनी केले. दिवस रात्रीचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या सर्व अडचणी सोडण्यात ते नेहमी तत्पर असतात त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लब जळगाव स्टार्स यांच्या तर्फे त्यांना युवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भाऊसो गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालय, भाऊसाहेब गुलाबराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी. डी. कंखरे सर  इंग्लिश मिडीयम चे प्रिन्सिपल श्री सचिन पाटील सर, जूनियर कॉलेज चे प्राचार्य श्री योगेश करंदीकर सर   उपस्थित होते. तसेच तीनही  विभागाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी माननीय प्रतापरावजी गुलाबरावजीं पाटील यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. दादांनी आपल्या मनोगतात यापुढेही समाजकार्य असेच चालू ठेवून सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने