ॐकार स्वरुपा सदगुरू समर्था.. अनाथांचे नाथा.. तूज नमो..ने 'पाडवा पहाट 'भजन गीतांनी रंगली.. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या भैरव रागाचे सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध..चोपड्यात मयूर म्यूझिक गृपचा अनोख्या कार्यक्रमाची गोड चर्चा

 

ॐकार स्वरुपा सदगुरू समर्था.. अनाथांचे नाथा.. तूज नमो..ने 'पाडवा पहाट 'भजन गीतांनी रंगली.. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या भैरव रागाचे सादरीकरणाने श्रोते झाले मंत्रमुग्ध..चोपड्यात मयूर म्यूझिक गृपचा  अनोख्या कार्यक्रमाची गोड चर्चा



चोपडा दि.०३एप्रिल (प्रतिनिधी) -  येथील संगीत शिक्षक वसंत मयूर यांनी २ एप्रिलला आयोजित केलेली पाडवा पहाट अभंग,  भजन व वाद्य वादनाने खूप रंगली. कार्यक्रमाची सुरवात मनोज चित्रकथी यांच्या ॐकार स्वरुपाने झाली. जळगावचे​ सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डाॅ.अभय गुजराथी यांनी जळगावहून खास या कार्यक्रमासाठी येऊन भजन सादर केले. डाॅ.लोकेंद्र महाजन, डॉ.आर्. सी. गुजराथी,डॉ. महेंद्र जैस्वाल, प्रिती गुजराथी, सरिता टाटीया यांचा अभंग तसेच हेमश्री पाटील हिने पेटीवर वाजविलेला मालकंस राग, सत्यम सोनवणे, लिना सोनवणे, तुषार बागुल, पार्थ गुजराथी यांनी सादर केलेली तबला जुगलबंदी सोबतच विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या भैरव रागाच्या सादरीकरणाने कार्यकमाची रं‌गत खूपच वाढली.

या कार्यक्रमात भावना गुजराथी, दिपाली धनगर, अंजली देशमुख,  गायत्री रनाळकर, जयश्री महाले यांनी सुद्धा अभंग व भजन सादर केले. सच्चिदानंद भारती यांच्य भैरवी रागाने कर्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक वसंत मयूर यांनी केले.

या कार्यक्रमात अॕड. संदीप पाटील, डाॅ. विकास हरताळकर, माधुरी मयूर, गोविंद गुजराथी,  ,विकास गुजराथी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने