सर्व सामान्य जनतेशी नातं जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे "' भला माणूस "' अरविंद फुटाणे यांनी साधे पणाने केला वाढदिवस साजरा
राळेगाव दि.२१ (तालुका प्रतिनिधी धिरज खेडेकर ) तालुक्यातील सर्व सामान्याचं नेतृत्व मा.अरविंद फुटाणे तालुका अध्यक्ष आज अंगारकी चतुर्थी आणि यांच्या वाढदिवसा निमित्त आलेला योग हा अमृत योग होता हा वाढदिवसाचा आनंद उत्सव संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे सर्व सामन्यात समर्पित केला.
अरविंद फुटाणे "' एक भला माणूस "' सर्वांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्त्व आहे जातीपातीच्या पलिकडे जाऊन खेड्यापाड्यात सामाजिक भावना निर्माण करुन सर्व सहभागी गरीब, श्रीमंत मित्र परिवार वाढदिवसाच्या निमित्ताने या सोहळ्यात प्रामुख्याने सहभागी झाले होते.
सर्व घटकांतील निमंत्रित मित्र परिवार प्रामुख्याने मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मुकुंद वाटकर विनोद भाऊ पराते नितीन ठाकरे मंगेश मेश्राम जेष्ठ पत्रकार मा महेश जी शेंडे फिरोज लाखांनी नगर पंचायत चे सदस्य सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच अंकुश भाऊ मुनेश्वर माजी जिल्हा परिषद सदस्य लेतुजी जुनगरे अनेक सामाजिक कार्यकर्त्या च्या उपस्थित संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे पुरणपोळी प्रसाद घेऊन वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला