थायलंड फूकेत पिकलबॉल स्पर्धेची सुवर्ण पदकाची मानकरी कू.स्नेहल किशोर पाटीलचा ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव


 थायलंड फूकेत पिकलबॉल स्पर्धेची सुवर्ण पदकाची मानकरी कू.स्नेहल किशोर पाटीलचा ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव

जळगाव दि.२२(प्रतिनिधी):   थायलंड फूकेत  येथे झालेल्या एशिया ओपन पिकलबॉल स्पधेत  *कू.स्नेहल किशोर पाटील*रा.चुचाळे तालुका चोपडा जिल्हा जळगाव हि वेगवेगळ्या गटातील चार सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. 19 वर्ष वरील महिला एकेरी सामन्यात सुवर्ण पदकाची लूट  करत "Queen of Asia "चा मान मिळवत पुढील आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्र ठरली. 

       सदर स्पर्धेत पंधरा देशांचा सहभाग होता. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका, आयोजक थायलंड या प्रतिस्पर्धी ना नमवत स्नेहल ने आपले वर्चस्व कायम राखले.

          त्याप्रसंगी जळगांव येथे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग.मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब, माजी जलसंपदा मंत्री श्री.गिरीश भाऊ महाजन, जळगांव शहराचे आमदार श्री.राजुमामा भोळे, खासदार. रक्षा ताई खडसे, उमेश दादा पाटील,आ.संजय भाऊ सावकारे,आ.मंगेश दादा चव्हाण.,जिल्हा परिषद अध्यक्ष:-रंजनाताई पाटील, आ.चांदूलाल पटेल. महानगर जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी.माजी खासदार:-एम के आण्णा पाटील. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत *कु.स्नेहल किशोर पाटील* हिचा सत्कार व सन्मान सोहळा पार पडला त्या प्रसंगी चोपडा तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आत्माराम भाऊ माळके मा.सभापती राकेश पाटील जिल्हाउपध्यक्ष भाजपा पंकज पाटील तालुकाध्यक्ष गजेंद्र जैसवाल शहराध्यक्ष प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष नरेंद्र पाटील युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय श्रावगी प्रेम घोडगे युवा मोर्चा सोशल मीडिया सहसयोजक हेमंत देवरे  मोतिलाल सोनवणे योगेंद्र भाऊ व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित  उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने