*वेडसर महिलेने मारली वीट..अन् तो कोसळला असता धारातीर्थ.. पोलिसी खाक्या चालला नसता तर शिवाजी महाराज चौकात काय घडले असते..? वेडसरांचा प्रश्न ऐरणीवर.. कोणी मायचा लाल.. त्यांचा वालीच उरला नाही रावं ...!*


 *वेडसर महिलेने मारली वीट..अन् तो कोसळला असता धारातीर्थ.. पोलिसी खाक्या चालला नसता तर शिवाजी महाराज चौकात काय घडले असते..? वेडसरांचा प्रश्न ऐरणीवर.. कोणी मायचा लाल.. त्यांचा वालीच उरला नाही रावं ...!*

चोपडा दि.१२ (प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी)चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वेडसर महिलेने एका इसमास वीट मार केल्याने  तो बालंबाल बचावला असून विद्यार्थी व लोकांची पळापळ झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला मात्र ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधाने पुढील अनर्थ टळला..पण यानिमित्ताने शहरातील वेडसर असलेल्यां अनेक स्त्री ,पुरुष व बालकांचा  आभाळा एव्हढा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे..या लोकांचे पुनर्वसन म्हणा की जीवनाचा आधार म्हणा यासाठी कोणी माईचा लाल  , सामाजिक संस्था तथा पोलिस वा नगरपालिका पुढे येईल  का?  हा प्रश्न  अनुत्तरीत जरी असला तरी त्याचं उत्तर कुठेतरी दडलेले आहे.त्यादृष्टीने प्रयत्न झाले तरी त्यातील काहींना जीवनाची चव चाखता येणार आहे .नुसते ठाणें मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी लाख मोलाचे होईल अशी प्रतिक्रिया शहरवासीयांतून व्यक्त केली जात आहे.जेणेकरुन त्यांचेही व लोकांचे जीवन सुरक्षित होणारं आहे.

    मानवी जीवन हे सुंदरतेने मढलेले आहे असं म्हणतात पण दृष्ट लागावी असा प्रसंग बिचाऱ्या वेडसर लोकांच्या जीवनात काळाने अन्याय करत पाणीच फेरले आहे .कुठेही अन् कसं झोपा.. अंगावरची अनंत दिवसाचे मळकट फाटकळ कपडे.. अस्वच्छ दुर्गंधीयुक्त शरीर.. सोबतीला उष्टे खरकटे अन्न नशीबी पाचवीला पूजलेले.मानव असूनही मानवी जीवनापासून कोसो दूर  .. जीवनाचे भान हरपलेल्या व आपल्या रक्ताच्ं नात् गोत विसरलेल्या या गटाचा वाली कोणीच नाही असं केवीलवाणी चित्रं आज अनेक ठिकाणी पाहवयास मिळतं आहे. नकळतच विचारवंतांच्या डोळ्यातून अश्रूंचे टीपूस बाहेर पडतात.तरीही या बिचाऱ्यांचा विचार तेव्हढा पूरताच होतों.त्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत  एव्हढीच अपेक्षा..या घटनेपित्यर्थ..!
खरं पाहता वेडसर महिलेने शिवाजी महाराज चौकात एका इसमाला मारलेली वीट खांद्याऐवजी डोक्याला लागली असती तर तो इसम जागीच धारातीर्थ कोसळला असता.. एखाद्या वेळेस जीवही गमवावा लागला असता तितक्या ताकदीने ती  वीट मारण्यात आलेली होती.यावरही ती महिला जोरजोरात हसत दुसरा दगड तिनें गर्दीच्या दिशेने फिरकावला होता.विद्यार्थी व लोकांनी सैरावैरा पळण्याचा प्रारंभ केला होता त्याचवेळेस  छत्रपती शिवाजी महाराज पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी विजय बच्छाव व शक्ती अहिरे यांनी आपल्या दंडूक्याचा धाक दाखवत महिलेच्या वेडसरपणाला आवर घातला .नाही तर काही तरी अनर्थ घडला असता.  मानवांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय योजनांची अंमलबजावणी होत आहे मात्र अशा व्यक्ती करिता कोणी का पुढे येत नाही  ही एकच खदखद मनात सल करणारी अशीच आहे.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने