आई-वडीलांचा लग्नाच्या वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा ..बाविस्कर कुटुंबियांच्या आरोग्यदायी स्तुत्य उपक्र

    

आई-वडीलांचा लग्नाच्या वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा ..बाविस्कर कुटुंबियांचा आरोग्यदायी स्तुत्य उपक्रम

अमळनेर दि.१२(प्रतिनिधी)   आई-वडीलांचा लग्नाच्या वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा बाविस्कर कुटुंबियांच्या आरोग्यदायी स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अलीकडे लग्नाच्या वाढदिवस विसरल्यांने भांडणे होतात,भांडणे विकोपाला जातात.सरांचा पहिला,दुसरा नव्हे तर लग्नाच्या तब्बल ५६ वा लग्नाच्या वाढदिवस लहान बालकांसाठी आरोग्यदायी होण्यासाठी त्यांनी आरोग्यदायी उपक्रम राबवत सौ.लक्ष्मीबाई व प्रल्हाद बाविस्कर यांनी वय १ ते १४ वयोगटातील लहान मुले व मुलींचा उपचाराचा व औषधीसाठी लागणार १२.००० हजारापर्यंत खर्च ते संपूर्ण एक वर्ष करणार आहेत (प्रत्येकी रूग्णाला )खर्च करणार आहेत व पुढील मोठा खर्च आर.आर.फाऊंडेशन जळगांव चे अध्यक्ष ताईसो.स्वाती अजय बाविस्कर यांच्या वतीने करण्यात येणार आहे बाविस्कर कुटुंबियांच्या या आरोग्यदायी स्तुत्य उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे ...

सामाजिक जाणीव ठेवून आपले गांव अंबाप्रिंपी व संर्पूण बहादूर गटातील ३५ गांवातील मुलांन साठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. अमळनेर शहरातील सेवानिवृत्त शिक्षक श्री.प्रल्हाद रामदास बाविस्कर व सौ लक्ष्मी बाई प्रल्हाद बाविस्कर मा.नगरसेवक न.पा.अमळनेर यांनी आपला ५६ वा लग्नाच्या वाढदिवस अंत्यत साध्या व घरगुती पध्दतीने त्यांचा लहान कन्या सौ.सोनाली व जावाई श्री.रवींद्र पांडूरंग सोनवणे ( प्रा.शि.मंगरूळ ता.पारोळा) यांच्याकडे साजरा केला .

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ०१ ते १४ वयोगटातील सर्व लहान बालकांच्या उपचाराचा व औषधीचा १२.०००/ खर्च हे दाम्पत्य पेलणार आहे व त्या पुढील जास्तीचा खर्च ज्यांना लागत असेल त्यांच्यासाठी आर.आर.फाऊंडेशन चे अध्यक्ष व समाजातील प्रतिष्ठित व दानशुर लोकांचा मदतीने ते आर्थिक स्वरूपात करतील या महीन्यांच ताईसो. स्वाती अजय बाविस्कर यांनी जळगांव पोलीस कर्मचारी चा लहान मुलांचा उपचारासाठी २ लाखं ५० हजारांचा निधी आर.आर.फाऊंडेशन व समाजातील प्रतिष्ठित व दानशुर लोकांचा मदतीने करून दिला आहे.

अमळनेर येथील डॉ.जी.एम.पाटील (बालरोग तंज्ञ ) 

जळगांव येथील डॉ.राजेन्द्र विश्वनाथ पाटील एम.डी.बालरोग तंज्ञ 

डॉ.दिपक आठवले एम.डी.बालरोग तंज्ञ जळगांव यांच्या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी ०१ते १४ वर्षातील मुलांचे उपचार आर.आर.फाऊंडेशन जळगांव यांचा मार्फत च केले जातील किंवा इतर दवाखान्यात असल्यास योग्य ती मदत औषधी स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात केली जाईल. आधिक माहीती व मदतीसाठी सौ.स्वाती अजय बाविस्कर कृष्णा कंट्रक्शन जळगांव मो.८००३३३३५०

श्री. अजय प्रल्हाद बाविस्कर मो.९२८४७२८५५०जळगांव. 

श्री. गोविंद नागराज पाटील अंबाप्रिंपी मो.८३०३८४९२८३.

श्री.डॉ.राजेन्द्र रामदास शैलकर न.पा.वैघकिय आधिकारी अमळनेर मो.९४२२२३३६९७  कृपया वरील नंबरावर आधी संर्पक साधावा. 

आई कुलस्वामिनीदादासाहेब श्री प्रल्हादरामदास बाविस्कर व सौ.लक्ष्मी बाई बाविस्कर यांना दीर्घायुष्य देवो.

शुभेच्छुक सौ.सुरेखा व रामचंद्र सपकाळे 

सौ.सोनाली व रविंद्र सोनवणे 

सौ.अश्विनी व संजय बाविस्कर 

सौ.दिपाली व विजय बाविस्कर 

सौ.स्वाती व अजय बाविस्कर

महिला प्रदेश अध्यक्ष कोळी समाज महाराष्ट्र. 

नातु अक्षय,मयुरी,प्रथमेश,प्रतीक,अजिंक्य,वीरभद्र,महारूद्र,कृष्णा,गार्गी,पद्मलक्ष्मी आदींनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने