आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते उद्या ७ कोटी ८५ लाखांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा*गुळ नदीवर मोठ्या पूलाचे बांधकाम
चोपडा दि.१२( प्रतिनिधी) मा.आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा)यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विविध विकास कामांचा
भुमिपुजन सोहळा दि. १३ मार्च २०२२, रविवार रोजी
त्यांच्या शुभहस्ते व मा.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपडा विधानसभा तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे
उद्या होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम असा,
१) गलंगी येथे गटारीसह रस्ता ट्रिमिक्स व काँक्रीट करणे.८०.०० लक्ष (ऐंशी लाख रुपये)वेळ : दुपारी ०३.३० वा.
२) अकुलखेडा पूल ते गुळ नदी पुलापर्यंत १०.५० किमी रस्त्याची सुधारणा करणे.२८०.०० लक्ष (दोन कोटी रैंशी लाख रुपये)वेळ : दुपारी ०४.०० वा.
३) गुळ नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे.३२५.०० लक्ष (तीन कोटी पंचवीस लाख रुपये)वेळ: संध्याकाळी ०४.३० वा.
४) मंगरुळ फाट्याजवळ लहान पु
बांधणे. १००.०० लक्ष (एक कोटी रुपये)वेळ : संध्याकाळी ०५.०० वा.
तरी चोपडा विधानसभा मतदार संघातील समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.