*मितावली येथे पेव्हर ब्लॉकचे काम जोमात.. गावात अण्णासाहेबांचे विरोधक कोमात..! चोपडा तालुका पावसाळ्या आधी संततधार विकास कामांनी चिंब..हेच कार्यसम्राट आमदारांचे दिसतेयं प्रतिबिंब..!!*


 

*मितावली येथे पेव्हर ब्लॉकचे काम जोमात.. गावात अण्णासाहेबांचे विरोधक कोमात..! चोपडा तालुका पावसाळ्या आधी  संततधार विकास कामांनी चिंब..हेच कार्यसम्राट आमदारांचे दिसतेयं प्रतिबिंब..!!*

चोपडा दि.०७(प्रतिनिधी): तालुक्यातील मितावली येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या कामास जोरदार सुरुवात झाली असून  पेव्हर ब्लॉकचे काम तेज गतीने होत असल्याने नागरिकांनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट  माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांनी लावलेला विकास कामांचा सपाटा थांबता थांबत नसून चौफेर विकास कामांचा पताका लहरत आहेत. आतापर्यंत असे कामे कोणीच केलें नसल्याने  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.ईतकेच नव्हे कोणत्याही गावाची विकास कामांसाठी मागणी नसून ही आपले आद्य कर्तव्य असल्याची खूनगाठ बांधून धो धो पाऊस पडावा असा संततधार विकास कामांनी तालूका चिंब होतो आहे त्याचाच भाग म्हणून मितावली गावात पेव्हर ब्लॉकचे काम धुम धडाक्यात होत असल्याने पाऊस पडण्या आधीच गावातील चिखलाचा नायनाट होत असल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी आ.लताताई सोनवणे व अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यां सोनवणे दाम्पत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने