*विधान भवनाच्या आवारात कर्तव्य दक्ष महिलांचा यथोचित गौरव.. ना.एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार तर चोपडयाच्या आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांची खास उपस्थिती*
मुंबई दि.०८(वृत्तसंस्था)
महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२२सुरु असून आज दि ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानभवनाच्या आवारात उल्लेखनीय कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा गौरव ना.मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
आज जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधिमंडळाच्या आवारात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, पत्रकार तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समस्त महिला भगिनींचा सन्मान करित शुभेच्छा दिल्या. यावेळी चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आदिवासी कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व श्रीमती मंजुळा गावित ह्या आवर्जून उपस्थित होत्या.