भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू..१५जण जखमी.. खंडेराव महाराजाचे दर्शन घेउन परतणऱ्या भाविकांच्या टेम्पो पलटी..मयत मुंदखेड्याचे रहिवासी
चाळीसगाव दि.०७ ( प्रतिनिधी सतिष पाटील):- नवसाचा कार्यक्रमासाठी चंदनपुरी चंदनपुरी येथे खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तालुक्यातील मुंदखेडा बु, येथील भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन चार जण जागीच ठार झाली आहेत तर अन्य 13 जण जखमी झाली यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे
रविवारी हजारो भाविक या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात मुदखेडे बु ता चाळीसगाव येथील बाबाजी पाटील यांच्या नातेवाईकांकडे नवसाचा कार्यक्रम होता म्हणून रविवारी (दि.6) गोधळासाठी चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथिल भविक टेम्पो क्र.MH 19 BM 0102 ने चंदनपुरी गेली परतत असतांना मालेगाव-चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. झालेल्या अपघातात 04 ठार तर 13 भाविक जखमी झाले आहेत.जखमी पैकी 03 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
सायंकाळी 6 हा अपघात झाला असून रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू होते.अपघात इतका भीषण होता की रात्री उशिरापर्यंत मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती.मात्र ओळख पटल्यावर याबाबत माँहिती त्यांच्या मूळ गावी कळवल्या नंतर ग्रामस्थांनी मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली
चुकीच्या पद्धतीने बांधलेले गतिरोधक
अपघाताला कारणीभूत
तसे पहाता महामार्गावर गतिरोधक असत नाही मात्र मालेगाव तालुक्यातील गिगाव फाट्यावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा अपघात झालेचे सागितलं जात आहे फाट्यावर असलेल्या गतिरोधक चालकाला दिसला नाही त्याकडे दुर्लक्ष झाले टेम्पो पलटी झाला. टेम्पोने 3 ते 4 पलटी घेतल्याने त्यातील 04 भाविकांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये आबाजी जालम पाटील (60), बन्सीलाल सदा पाटील (43), कालाबाई पोपट पाटील( 35), कंतील पोपट पाटील याचा सामावेश आहे अन्य 13 भाविक जखमी आहेत.जखमीपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.दरम्यान रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू असून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घ्यायचे काम सुरू होते. अपघातात ४ जण ठार झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.चंदनपुरीदनपुरी येथील खंडेराव महाराजांचे दर्शन घेऊन चाळीसगावकडे परत जाणाऱ्या वाहन चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील गिगाव फाट्याजवळ पलटी झाल्याने झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यु झाला तर १५ ते २० जण जखमी झाले आहेत. त्यांना मालेगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा येथील भाविक मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी रविवारी (दि. ६) रोजी टॅम्पोने आले होते. दिवसभर थांबल्यानंतर ते संध्याकाळी गावी परत जाण्यासाठी निघाले. त्यांचे वाहन क्रमांक एमएच १९ बीएम ०१०२ गिगाव फाटयाजवळ आले असता पलटी झाल्याने झालेल्या अपघातात बन्सीलाल राघो पाटील (४३), आबाजी पाटील (६०), लीलाबाई पोपट पाटील (६५), कांतीलाल पोपट पाटील (४८ सर्व रा. मुंदखेडा ता. चाळीसगाव) यांचा जागीच मृत्यु झाला तर १५ ते २० जण जखमी झाले आहेत.
या वाहनात २० ते २५ जण असल्याची माहिती मिळते आहे. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, एन. बी. राजपूत, एच. टी. खांडेकर, दिनेश जाधव, अविनाश सोनवणे आदी पोलीस कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चौघाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. एका प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरून जात असतांना दुचाकीस्वराला वाचवण्याच्या प्रयत्नांत टेम्पो उलटला. तर काहींनी टेम्पोला मागून वाहनाने धडक दिल्याचे सांगितले. त्यामुळे अपघातचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत