उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महत्त्वाची आढावा बैठक*
चोपडा दि.७ ( प्रतिनिधी)देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशान्वये मा.श्री.अजितदादा पवार यांनी जळगाव जिल्ह्याचा पालकत्व पद स्वीकारले असून येणाऱ्या आगामी निवडणुका जि.प ,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुका नियोजन साठी *मा.श्री.अविनाशजी आदिक * निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 08/03/2022 रोजी सकाळी 10:00 वाजता चोपडा पीपल्स को-ऑफ बँक.लि.चोपडा सभागृहात (रथगल्ली ) मेन शाखेत* बैठक आयोजित करण्यात आली आहे.
*बैठक*मा.श्री.अरुणभाई गुजराथी* माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली त्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत येणाऱ्या आगामी निवडणुका जि.प ,पंचायत समिती,नगरपालिका,बाजार समिती,शेतकी संघ, साखर कारखाना,सूतगिरणी या सर्व सहकार क्षेत्रातील आजी माजी संचालक मंडळ यासंदर्भात आढावा बैठक आयोजित केली आहे
तरी आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी चोपडा तालुका चोपडा शहर चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व जिल्हा पदाधिकारी तालुकाध्यक्ष,शहर अध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सहकार क्षेत्रातील आजी- माजी संचालक आपण देखील उपस्थित रहावेअसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे