ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिलादिनी महिलांचा गौरव.. संघांचे अध्यक्ष व्ही.एस.करोडपती यांची माहिती


 

ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिलादिनी महिलांचा गौरव.. संघांचे अध्यक्ष व्ही.एस.करोडपती यांची माहिती

चोपडा (प्रतिनिधी) ‘आजादी का महोत्सव’ अंतर्गत आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाद्वारा कर्तृत्ववान नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या ८ मार्च रोजी हा महिला सम्मान समारोह व पुरस्कार सोहळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या नारायणवाडी, विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या भवनात दुपारी ठीक ४ वाजता होणार आहे.या सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये चोपडा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सुरक्षा, साहस यांसारख्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती संघाचे अध्यक्ष व्ही.एस.करोडपती यांनी दिली आहे.

यावेळी सौ. ताराबाई दिलीपराव पाटील (माजी नगराध्यक्षा, चोपडा नपा.), सौ. पूनम आशिषलाल गुजराथी (सिनेट सदस्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), श्रीमती प्रा. आशा रमेश वाघजळे (शिक्षणतज्ज्ञ-सुत्रसंचालिका, चोपडा), या मान्यवरांच्या हस्ते, तर डॉ. सौ. तृप्ती राहुल पाटील (नेत्ररोग तज्ञ, चोपडा) यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येणार आहे. 

यांचा होणार सन्मान…
श्रीमती ललिता रमेशसिंग परदेशी (आरोग्य सहायिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले), श्रीमती मिना गोरख पाटील (अंगणवाडी सेविका, घुमावल बु.), श्रीमती योगिता हरी न्याहळदे (अव्वल कारकून, तहसील कार्यालय, चोपडा), श्रीमती रत्ना पंढरीनाथ बडगुजर (महिला होमगार्ड, चोपडा युनिट), श्रीमती वैशाली मधुकर पाटील (तलाठी, मंगरूळ, ता. चोपडा), श्रीमती मनीषा खुमानसिंग बारेला (तलाठी, वडती, ता. चोपडा), श्रीमती रत्नमाला हंसराज शिरसाठ (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, चोपडा), श्रीमती अनिता विलेश सोनवणे (स्टाफ नर्स, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा), श्रीमती विमलबाई भिल (वर्डी, ता. चोपडा), सौ. पल्लवी रुपेश नेवे (महिला पोलीस, ग्रामीण पोलीस स्टेशन, चोपडा), श्रीमती हेमलता महेंद्र पाटील (तलाठी, गरताड, ता. चोपडा), श्रीमती भावना अरुण सांगोरे (फॉरेस्टर, सामाजिक वनीकरण विभाग, चोपडा), श्रीमती प्रतिभा आबाजी पाटील (अंगणवाडी सेविका, मजरेहोळ, ता. चोपडा), सौ, लक्ष्मीबाई राजेश पालिवाल (समाजसेविका, चोपडा), सौ. सुनिता तेरसिंग बारेला (आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागलवाडी, ता. चोपडा), श्रीमती मंगला प्रताप निकुंभे (आशा वर्कर, चोपडा). 

तरी या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही. एस. करोडपती, उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, सचिव प्रमोदनाना डोंगरे आणि महिला विभागप्रमुख शंकूतलाबेन गुजराथी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने