वढोदा येथील सरपंच संदिपभैय्या सोनवणे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

 वढोदा येथील सरपंच संदिपभैय्या सोनवणे  समाजभुषण  पुरस्काराने सन्मानित 



मनवेल ता.यावल दि.७(प्रतिनिधी गोकुळ कोळी) : वढोदा येथील सरपंच तथा सरपंच परिषद मुंबई यावल तालुका अध्यक्ष संदिपभैय्या प्रभाकर सोनवणे  याच्या सामाजिक कार्याची दाखल घेत जळगाव येथील राजनंदिनी बहुद्देशीय संस्था याच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्कारामध्ये सन 2021-22 या वर्षेतील सामाजिक व राजकीय  क्षेत्रातील पुरस्कार श्री संदिपभैय्या सोनवणे समाजभुषण पुरस्काराने  देऊन गौरविण्यात आले.

६ मार्च रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यलया अल्पबचत भवन येथे राजनंदिनी बहुद्दशिय संस्थेच्या वतीने का कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव चे माजी महापौर विष्णू भंगाळे होते तर प्रमुख पाहुणे जळगाव महापौर जयश्री ताई सुनील महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील हे होते त्यात राज्य भारतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध मान्यवराचा सत्कार व पुरस्कार मानवरांच्या हस्ते देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने