काल्पनिक चित्र
फँक्टीत नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ.. वडतीच्या माहेरवाशीणीची पोलिसांत तक्रार
चोपडा दि.,०७ (प्रतिनिधी)तालुक्यातील वडती येथील माहेरवाशीणी विवाहितेचा जळगाव येथील सासरी फँक्टीत नोकरी लावण्यासाठी १ लाख रुपये आणावेत,व पती,सासरे, आज्यासासु,सासु,जेठ,ननंद याच्या कडून जयश्री अक्षय कोळी माहेरवाशीणीवर याच्या वर काळ्या जादु प्रयोग,शिवीगाळ,तुच्छ वागणूक,यासाठी छळ करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी जयश्री अक्षय ठाकरे वय २० धंदा घर काम रा.मेस्को माता नगर जळगाव ह.मु.वडती ,ता.चोपडा वरील ठिकाणी परिवारासह राहते माझे लग्न ०८/०५/२०२१ रोजी अक्षय एकनाथ ठाकरे यांच्याशी हिंदू रितीरिवाज प्रमाणे वडती ता.चोपडा झालेले असून
लग्नानंतर मी लागलीच जळगाव येथे सासरी नादण्यासाठी गेले होती.मी १) अक्षय एकनाथ ठाकरे २) सासरे एकनाथ सुकलाल ठाकरे ३) आज्या सासु चमेलाबाई सुकलाल ठाकरे ४) सासु बेबाबाई एकनाथ ठाकरे ५) धनराज एकनाथ ठाकरे अशा परिवारासह एकत्र कुटुंबात सुमारे ३ महिने संसार केला लग्नात माझे वडीलांनी सुमारे लाख रुपये खर्च केले
त्यात सोन्याचे दागिने घेतले होते. सासरी नादत असताना सुरुवातीचे ४ ते ५ दिवस परिवारातील लोकांनी चागली वागणूक दिली त्यानंतर माझे पती १)अक्षय एकनाथ ठाकरे२) सुकलाल एकनाथ ठाकरे ३) आज्या सासु चमेलाबाई सुकलाल ठाकरे ४) बेबाबाई एकनाथ ठाकरे ५) जेठ धनराज एकनाथ ठाकरे अशांनी मला माझे पती यांना फँक्टरीत नोकरी लावण्यासाठी एक लाख रुपये तुझ्या वडीलानकडुन घेऊन ये त्यावेळी मी त्यांना समजून सागितले की माझ्या वडीलांनी लग्नामध्ये आत्ताच एवढा पैसा खर्च केलेला आहे त्याच्या कडे पैसे नाही असे सागितल्याचा राग आल्याने मुद्दाम स्वयंपाकात चुका काढू लागले व टोचून बोलुन, मानसिक व शारिरीक त्रास देऊ लागले पदोपदी आई बहीनीवरून शिवीगाळ व दमदाटी करू लागले पती मला जबजस्तीने ध्यानसाधना करायला लावायचे व मला मोलकरीची वागणूक तसेच माझी नणंद सुनिता ईश्वर सोनवणे रा. काल्हेर ता.जि.ठाणे ही माझे लग्न झाल्यापासून २ ते ३ वेळेस जळगाव येथे आमच्या घरी आली होती तिने सुध्दा माझे पती यांना उलट सुलट सागुन हिने तिच्या वडीलांकडुन पैसे आणले नाही का अजुन हिला परत माहेरी हाकलून द्या असे सागुन परिवाराला चेतावणी दिली होती सदरची घटना मी माझे वडील,आई, बहीण, तसेच परिवारातील लोकांना वेळोवेळी सागितलेली आहे. तसेच सन २०२१ मध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वरील लोकांनी मला मारहाण केली डाव्या दंडावर मला चटके लावले होते त्यानंतर २०२१ पासुन माहेरी टाकून घातले आहे म्हणून माझे पती १) अक्षय एकनाथ ठाकरे २) एकनाथ सुकलाल ठाकरे ३) आज्यासासु चमेलाबाई सुकलाल ठाकरे ४) सासु बेबाबाई एकनाथ ठाकरे ५) जेठ धनराज एकनाथ ठाकरे अ क्र १ ते ५ रा मेस्को माता नगर जळगाव ता. जि. जळगाव ६) सुनिता ईश्वर सोनवणे रा. काल्हेर.ता.जि.ठाणे यांच्या विरुद्ध माझी कायदेशीर फिर्याद आहे. गुरज. २७/२२ भा.द.वि.कलम ४९८/अ, ३२३,५०४,५०६,३४ गुन्हा दाखल करण्यात आले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.नसिर तडवी करीत आहे.