आशा सेविका नसल्याने आदिवासी भागात नागरिकांची फरफट
चोपडा दि.०७(प्रतिनिधी): तालुक्यातील(चुंचाळे) उजाड कर्जाणे गावाची लोकसंख्या जवळ पास ३०० ते ४०० असुन त्या ठिकाणी सर्व मागासलेला आदिवासी पावरा व भिल्ल समाजाच्या लोकांची वस्ती असून गावामध्ये २ ते ३ वर्षांपासून आशासेविका नाही. म्हणून आमच्या गावातील लोकांना कुठल्याही आरोग्य विषयक सुविधा मिळत नाहीत.गावातील सर्व महिलांची प्रसुती घरीच होतात व त्यांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही गावात २ ते ३ महिने कोणतीच आरोग्य सुविधा पुरविली जात नाही व घरीच प्रसुती झालेल्या महिलांची नोंदणी आरोग्य सेविका माधुरी ज्ञानेश्वर बडगुजर उपकेंद्रात दाखवतात?असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे?तसेच गावातील लोकांना कुठल्याही आरोग्य सुविधा मिळत नाहीत.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्याकडे आर्वजुन लक्ष द्यावे व लवकरात लवकर चुंचाळे(उजाड कर्जाणे) गावातील लोकांना आरोग्य सुविधा पुरवावे.अशी आशा ग्रामस्थांनकडुन व्यक्त केली जात आहे.