नंदुरबारला २७ रोजी मंत्री के.सी.पाडवी यांचेशी घेणार निर्णायक भेट*
नंदुरबार दि.२६(प्रतिनिधी)
*आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी,डोंगर कोळी जमातींना अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा 108/1976 च्या नुसार संविधानिक अधिकार असूनही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र मिळत नसल्या मुळे वरील वंचित अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातीचे बांधव यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी व आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे येंथील जुलमी आयुक्त राजेंद्र भारूड यांचे हकालपटटी करण्याची कारवाई होण्यासाठी व गायकवाड समीतीचे अहवालात समाविष्ट असलेले अधिकारी यांचेवर कारवाई होण्यासाठी आमचे गऱ्हाणे ऐकावे व संबंधीतावर कारवाई करावे यासाठी चर्चा करण्यासाठी आमचे शिष्ठ मंडळ यांना वेळ दयावा. यासाठी आप्पासाहेब नामदेव येळवे व ॲड गणेश सोनवणे हे आदिवासी विकास मंत्री मा. के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी दि २७/०२/२०२२ रोजी निर्णायक भेट घेणार आहेत. व त्यानंतर निर्णायक आंदोलनाची दिशा ठरणार आहे.*
*आदिवासी विकास मंत्री मा.ऍड. के.सी.पाडवी यांनी आमचे अभ्यासकांशी चर्चा करून आदिवासी विकास विभागाचे सचिव, TRTI येथील आयुक्त राजेंद्र भारूड साहेब व सर्व अनुसूचित जाती पडताळणी समीती कडून नेहमीच बेकायदेशीर व घटनाबाह्य वागणूक दिल्या जात आहे त्यांचे जमातीचे दाखले कोणत्याही पुराव्याचा विचार न करता सरळ अवैध करून रद्दबातल केल्या जातात हे अन्यायकारक रित्या पक्षपातीपणा करतात. म्हणून त्यांचेवर कारवाई करण्यात यावी व त्यांचेशी बैठक लावण्यात यावी. यासाठी मा. आप्पासाहेब नामदेव येळवे व ॲड गणेश सोनवणे,श्री.लखीचंद बाविस्कर,श्री.आनंदा कोळी,श्री.संजय शिंदे,श्री.महेश सावळे,सौ.इंदूताई सोनिस,सौ.कविताताई कोळी, वैशालीताई चव्हाण,श्री.कांतीलाल सोनिस,श्री.नामदेवराव ठाकरे,श्री.भरत पवार,श्री.पंकज कोळी,श्री.वसंत कोळी हे दि. २७/०२/२०२२ रोजी नंदूरबार येथे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांचेकडे जायचे आहे.*
*आता आम्हाला संपूर्ण न्याय पाहिजे आहे. लढायचे तर जींकण्यासाठीच अशी ही आरपारची लढाई सुरू झालेली आहे.*
*तरी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील व परिसरातील कोळी जमात बांधवांनी दि. २७/०२/२०२२ रोजी आदिवासी विकास मंत्री मा.के.सी.पाडवी यांचे निवासस्थानी नंदूरबार येथे ठीक सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.*