गणपूर येथे केंद्राच्या ऍस्कॉड योजने अंतर्गत ,प्रशिक्षण मेळावा व लसीकरण शिबीर
गणपूर (ता चोपडा)ता 25: चोपडा पशु संवर्धन विभागाच्या वतीने येथे शेतकरी व पशुपालकांसाठी प्रशिक्षण मेळावा व लसीकरण शिबीर घेण्यात आले.यावेळी माधवराव पाटील,प्रमोद पाटील व ऍड बाळकृष्ण पाटील उपस्थित होते. सहाय्यक उपायुक्त डॉ एस आर गुजराथी यांनी यावेळी गुरांचे आरोग्य,वासरू संगोपन व विविध आजारांबद्दल माहिती दिली. डॉ व्ही आर तडवी, डॉ संतोष कणके, डॉ श्वेता मखराळे,के बी पाटील,व्ही बी पाटील,डी आर दातीर, टी व्ही चौधरी ,यांनी गुरांचे लम्पि आजाराच्या लसीचे लसीकरण केले.यावेळी 500 गुरांचे लसीकरण व गाभण जनावरांची तपासणी करण्यात आली व औषधी वाटप करण्यात आले.प्रकाश माळी, गोपाल मराठे,धरमचंद पाटील,मनोज पाटील,शेख इक्बाल खाटीक,किरण पाटील,इंद्रनील पाटील यांनी परिश्रम घेतले............