*वढोदा सरपंच यांचे विरुद्ध दाखल अर्ज जिल्हाधिकारी यांना केला खारीज*..अॕड.वसंत भोलाणकर यांच्या हरकतींवर यश








 

*वढोदा सरपंच यांचे विरुद्ध दाखल अर्ज जिल्हाधिकारी यांना केला खारीज*..अॕड.वसंत भोलाणकर यांच्या हरकतींवर यश
जळगाव दि.०५(प्रतिनिधी)वढोदा ता. मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२०- 21 मध्ये होऊन डॉ. राजेद्र फडके गटाचेन ७ व राष्ट्रवादी गटाचे ७ सम समान सदस्य निवडून आले व एक जागा रिक्त राहिली असल्याने सरपंच पदाचे निवडणूकीत चुरस निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व डॉ राजेंद्र फड़के गटाचे एक सदस्य अपात्र करणेसाठी (सरपंच निवडणुकीपूर्वीच अपरिपक्व स्टेजला जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज दाखल करून सौ. स्वप्ना संदिप खिरोळकर यांना ३ अपत्य असल्याचा कारणावरुन अपात्र करण्यासाठी मागणी केलेली होती त्यास सरपंच निवडणूकी पूर्वीच जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुनावण्या घेऊन अपात्रतेसाठी प्रकरण चालवले होते. त्यास अॅड. वसंत भोलाणकर यांनी हरकत घेऊन प्रकरण राजकीय हेतूने प्रेरीत असून या स्टेजला चालविता येणार नाहीअसा हरकत अर्ज दिला होता वढोदा येथील सरपंच पदाची निवडणूक ही खडसे गटासाठी व डॉ. फडके, गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष या सरपंच निवडणूकीकडे होते. जिल्हाअधिकारी यांनी अखेर या प्रकरणात सुनावण्या
घेवून दिनांक 22/09/2021रोजी प्रकरण निवडणुकीसाठी
बंद करुन दि.  31/01/2021 तक्रारदार, रोजी तक्रारदार द्वारकाबाई पारधी यांचा अर्ज फेटाळून सौ. स्वप्ना संदीप खिरोळकर सरपंच वढोदा यांना पात्र ठरविले.सौ.स्वप्ना खिरोळकर यांच्या तर्फे अॕड.वसंत भोलानकर यांनी कामकाज पाहिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने