नमन लोककलेलाही व्यवसायिक पद्धतीनेच भाडे आकारणी व्हावी- नमन लोककला संस्था


 



नमन लोककलेलाही व्यवसायिक पद्धतीनेच भाडे आकारणी व्हावी- नमन लोककला संस्था


मुंबई दि.०३(शांताराम गुडेकर ) नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत या नमन लोककला संस्थेच्या या महत्वपूर्ण मागणीवर दिनांक ०१ फेब्रुवारी२०२२  मंगळवार रोजी दामोदर नाट्यगृह (परेल-मुबंई) व्यवस्थापनाकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत नमन लोककला तसेच  नमन मंडळ/कलापथक/लोककलावंत यांना   नाट्यगृहात येत असलेल्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी या करीता दामोदर नाट्यगृह व्यवस्थापन बरोबर नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारतचे अध्यक्ष-सन्मा.रविंद्रजी  मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त नमनकर मंडळींच्या आणि कलाकारांच्या व्यथा मांडून "रंगभूमीवर इतर  कला सादरीकरणाला जो हक्क दिला जातोय! तोच हक्क आमच्या नमन लोककलेही मिळावा!" अशी रोखठोक भूमिका घेऊन तेवढ्याच  कुशलतेने  समन्वय चर्चा करून व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले.दामोदर नाट्यगृह व्यवस्थापनानेही सदरबाबत  सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वाशीत केले! सदर बैठकीला संस्थेचे सचिव सन्मा- श्री सुधाकर श्री.मास्कर  उपाध्यक्ष- श्री रमाकांत जावळे , श्री चंद्रकांत साळवी,  सौ.संगीता पांचाळ-बलेकर (का. सदस्य) श्री विजय साळवी, श्री.सुभाष धनावडे , श्री अमित कताळे (सदस्य) श्री शशिकांत भरती (सदस्य) श्री दिपक वेळुंडे श्री सुरेश मांडवकर, त्याच बरोबर पत्रकार व कार्यकारणी सदस्य श्री उदय दनदने आदी पदाधिकारी/ कार्यकारणी सदस्य, कलाकार उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने