विठ्ठल _रुक्माईचे दर्शन घेण्याचा व डोळे दिपवून टाकणारीआकर्षक रोषणाई


विठ्ठल _रुक्माईचे दर्शन घेण्याचा व  डोळे दिपवून टाकणारीआकर्षक रोषणाई 

नाशिकदि.३० (प्रतिनिधी दिलीप पाटील )प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या विठ्ठल व रुक्माई मंदिरावर  फुलांची आकर्षक रोषणाई करणेत आली होती. दि. २७ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असतांना खा. प्राथ. शिक्षक सेवक समितीच्या पंढरपूर तालुका शाखेच्या वतीने नियोजन केलेने विठ्ठल _रुक्माईचे दर्शन घेण्याचा व ही डोळे दिपवून टाकणारीआकर्षक रोषणाई पाहण्याचा योग आला. यावेळी देवस्थानाच्या  वतीने  पंढरपूर शहराचे प्रथम नागरिक श्री डीराज सर्वगोड, यांच्या हस्ते शिवाजी पुतळा येथे माझा सत्कार करणेत आला. यावेळी एस.एम. पाटील, उद्योगपती उत्तम पल्लेवार, यशवंत सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष भाई नितिन काळे, समितीचे शिक्षकेतर प्रमुख राजेंद्र कुमार बुध्याळ सर , पंढरपूर तालुकाप्रमुख वसंत चौरे सर हे उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने