*मजरेहोळफाटा ते गांवपर्यंतचा रस्ता दुरुस्तीची मागणी..*
*चोपडा दि.३०(प्रतिनिधी)* तालुक्यातील मजरेहोळ फाट्यापासुन गावापर्यंतचा फक्त १ ते दिड कि.मी.रस्ता अत्यंत खराब झाला असून वापरण्यायोग्य राहिलेला नाही.जुना डांबरी रस्ता पुर्णत: उखडल्याने रस्त्यावरील खडीमुळे लहानमोठे वाहन पंक्चर होऊन अपघात होत आहेत.गुराढोरांसह पादचारीही जखमी होत आहेत.याकडे संबंधित विभागाचे अक्षम्यं दुर्लक्ष झालेले असुन हा रस्ता त्वरित दुरूस्तीची मागणी येथील सामा.कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
मजरेहोळ हे गाव तालुक्यात उच्चभ्रू व श्रीमंत समजले जाते.येथे लग्न व इतर कार्यांसाठी जिल्हाभरांतुन येणारे नातेवाईक येताच "आमचे आदरातिथ्य करू नका,पण आधी रस्ता दुरूस्तीचे बघा" असे उपरोधात्मक बोलत असतात.त्यावेळेस मजरेहोळवासीय निरूत्तर होतात.ह्या रस्स्त्यावर होणार्या किरकोळ अपघातींवर चोपडा येथील जनसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये होत असते.याबाबत वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही रस्ता दुरुस्तीच्या कामाला विलंब होत आहे.संबंधित विभागाने हा रस्ता त्वरित दुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत, अन्यथा लवकरच चोपडा अमळनेर महामार्गावर मजरेहोळफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,अशी संतप्त भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.